Flipkart Sale: 28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर
By सिद्धेश जाधव | Updated: January 10, 2022 18:05 IST2022-01-10T17:40:07+5:302022-01-10T18:05:27+5:30
Flipkart Mobile Bonanza Sale ला आज म्हणजे 10 जानेवारी 2022 पासून सुरुवात झाली आहे. हा सेल उद्यापर्यंत म्हणजे 11 जानेवारी 2022 पर्यंत लाईव्ह असेल. या सेल दरम्यान स्मार्टफोनवर डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक देखील मिळत आहे. चला जाणून घेऊया यातील बेस्ट डिल्स.

Apple iPhone 12 Mini
हा फोन कंपनीनं 2020 मध्ये बाजारात आणला होता. ज्यात 12MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेलमध्ये हा फोन 40,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Infinix Smart 5A
Infinix Smart 5A स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये आहे. यात 6.52 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek Helio A20 प्रोसेसरसह येणारा हा फोन 5000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
Realme Narzo 50A
Realme Narzo 50A ची किंमत 12,499 रुपये आहे. ज्यात 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील 6000mAh ची बॅटरी आकर्षणाचा बिंदू आहे.
Infinix Hot 10 Play
6000mAh बॅटरी असलेला Infinix Hot 10 Play फ्लिपकार्ट सेलमध्ये 8,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यात MediaTek Helio G35 प्रोसेसरसह 6.82 इंचाचा एचडी+ डिस्प्ले, 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi 9i
Redmi 9i कंपनीचा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. ज्यात 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 4GB रॅम असे स्पेक्स देण्यात आले आहेत. याची किंमत फ्लिपकार्टवर 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे.
Realme C21Y
Realme C21Y मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Unisoc T610 प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी आणि 13 MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 9,499 रुपये आहे.
Poco C31
Poco C31 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं यात MediaTek Helio G35 SoC चिपसेटचा वापर केला आहे. यात 13MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत 9,999 रुपये आहे.
Samsung Galaxy F12
Samsung Galaxy F12 स्मार्टफोन 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. यात सॅमसंगचाच Exynos 850 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 48MP चा रियर कॅमेरा मिळतो. 6000mAh ची बॅटरी असलेला हा फोन 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Apple iPhone SE
आयफोन एसईमध्ये अॅप्पल ए9 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याची किंमत 27,999 रुपये आहे.