शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर्स अन् यूट्यूबवर 10 हजार सब्सक्राइबर्स; महिन्याला किती कमाई होईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:39 IST

1 / 6
Earning on Social Media: आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर फक्त मनोरंजनासाठीच नाही, तर कमाईचं एक मोठं साधन बनलं आहे. अनेकदा आपण ऐकतो की, कुणीतरी एक रील बनवून लाखो रुपये कमावले किंवा कुणाचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकांना वाटतं की, फॉलोअर्स वाढले म्हणजेच आपोआप पैसे येतात, पण प्रत्यक्षात असं अजिबात नाही.
2 / 6
सोशल मीडियावर कमाई ही तुमच्या फॉलोअर्स किती अ‍ॅक्टिव्ह आहेत आणि तुमचं कंटेंट किती लोक पाहतात, यावर अवलंबून असतं. जर तुमच्याकडे इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर्स आणि यूट्यूबवर 10,000 सब्सक्राइबर्स असतील, तर तुम्ही किती कमाई करू शकता? जाणून घ्या...
3 / 6
इन्फ्लुएंसर मार्केटिंग एजन्सी Kofluence च्या अहवालानुसार, ज्यांच्या इंस्टाग्रामवर सुमारे 1 लाख फॉलोअर्स आहेत, त्यांना मायक्रो इन्फ्लुएंसर म्हणतात. अशा क्रिएटर्सना एका इंस्टाग्राम रीलवरुन ₹60,000 ते ₹1.6 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. हे उत्पन्न पूर्णपणे रीलवरील व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्सवर अवलंबून असतं. जर कंटेंट ब्रँड प्रमोशनशी संबंधित असेल, तर रक्कम आणखी वाढू शकते.
4 / 6
यूट्यूबवर 10,000 सब्सक्राइबर्स म्हणजे चॅनेल अजून वाढीच्या टप्प्यात आहे. अशा क्रिएटर्सना यूट्यूब शॉर्ट्स किंवा व्हिडिओजमधून दर महिन्याला ₹20,000 ते ₹40,000 पर्यंत कमाई होऊ शकते. यूट्यूबवरील कमाई व्ह्यूज, वॉच टाइम आणि जाहिरातींवर अवलंबून असते. जर व्हिडिओजना चांगला ट्रॅफिक मिळत असेल आणि जाहिराती सुरू असतील, तर स्पॉन्सरशिप आणि ब्रँड डील्स मधूनही चांगले पैसे मिळतात.
5 / 6
अहवालानुसार, भारतात इंस्टाग्रामवरून यूट्यूबच्या तुलनेत जास्त कमाई होते. याचं मुख्य कारण म्हणजे, इंस्टाग्रामवर ब्रँड्स थेट इन्फ्लुएंसर्सशी डील करतात आणि रील प्रमोशनसाठी मोठी रक्कम देतात. तर यूट्यूबवर कमाई अ‍ॅड रेव्हेन्यू आणि व्ह्यूजवर अवलंबून असते, जी वेळोवेळी बदलते.
6 / 6
जर तुमच्याकडे फक्त 10,000 सब्सक्राइबर्स किंवा 50,000 ते 1 लाख फॉलोअर्स असतील, तरी तुम्ही सोशल मीडियावरुन कमाई सुरू करू शकता. छोटे ब्रँड्स प्रमोशनसाठी प्रत्येक पोस्ट किंवा व्हिडिओसाठी ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत देतात. सतत चांगलं कंटेंट तयार केल्यास, काही महिन्यांतच ही कमाई लाखोंपर्यंत पोहोचू शकते.
टॅग्स :YouTubeयु ट्यूबInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन