शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चुकूनही WhatsApp वर करू नका 'ही' कामं, अन्यथा खावी लागेल तुरुंगाची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:06 IST

1 / 9
2 / 9
सध्याच्या काळात व्हॉट्सॲप (WhatsApp) हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण दिवसभर WhatsApp वर मेसेज, व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? WhatsApp चा गैरवापर केल्यास तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो. WhatsApp द्वारे कोणतेही गैरकाम करणे कायदेशीर गुन्हा आहे. हे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबद्दल जाणून घ्या...
3 / 9
WhatsApp वर अश्लील, हिंसक किंवा धार्मिक आक्षेपार्ह मजकूर पाठवणे भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे. आयटी कायदा २००० च्या कलम ६७ अंतर्गत, असे केल्यास तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
4 / 9
WhatsApp ग्रुप्समध्ये खोट्या बातम्या पाठवणे आणि त्याची शहानिशा न करता अफवा पसरवणे हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे समाजात अशांतता पसरू शकते. आयपीसीच्या कलम ५०५ अन्वये अफवा पसरवणाऱ्याला तुरुंगात टाकले जाऊ शकते.
5 / 9
WhatsApp वर कोणालाही धमकावणे किंवा धमकावणारे मेसेज पाठवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. आयपीसीच्या कलम ५०३ अंतर्गत हा गंभीर गुन्हा आहे, ज्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.
6 / 9
WhatsApp वर जातीय, धार्मिक किंवा सामाजिक द्वेष पसरवणारे मेसेज पाठवणे टाळा. असे करणे समाजासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कठोर शिक्षा होऊ शकते.
7 / 9
बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कोणतीही डेटा WhatsApp वर शेअर करणे बेकायदेशीर आहे. असे करणे POCSO कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.
8 / 9
आधार कार्ड, पासपोर्ट इत्यादी सरकारी कागदपत्रांच्या बनावट प्रती बनवणे किंवा व्हॉट्सॲपवर शेअर करणे हा गुन्हा आहे. हे फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये येते.
9 / 9
कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. संवेदनशील विषयांवर कोणतीही सामग्री किंवा डेटा शेअर करणे टाळा. WhatsApp ग्रुप्समध्ये पोस्ट केलेल्या सामग्रीचे निरीक्षण करा. WhatsApp हे एक उत्तम संवादाचे माध्यम आहे, पण त्याचा गैरवापर करणे महागात पडू शकतो. त्यामुळे तुम्हीही WhatsApp जबाबदारीने वापरा.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान