शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विजेचं बिल जास्त येतं? 'या' तीन ट्रीकचा वापर करुन बिल निम्म्यावर आणा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 1:32 PM

1 / 9
सध्याचे वीज मोठ्या प्रमाणात महागली आहे, त्यामुळे आफण वीज कमी वापरासाठी प्रयत्न करत असतो. जास्त वीज बिलामुळे तुमचे संपूर्ण महिन्याचे बजेट बिघडू शकते.
2 / 9
वीज बिल कमी करण्यासाठी काही टिप्स आहेत. ज्यामुळे तुमचे वीज बिल कमी होईल. यासोबतच तुमचे बजेटही ठीक राहील.
3 / 9
आपण सर्वजण आपल्या घरात अशी अनेक इलेक्ट्रिक उत्पादने वापरतो, यासाठी भरपूर वीज वापरली जाते. म्हणूनच आपण ही उत्पादने वापरणे बंद केले पाहिजे. या उपकरणांचा वापर कमी केला तर तुमचे वीज बिल कमी येऊ शकते.
4 / 9
AC मध्ये 'हे'बदल करा - आपल्याकडे अनेकजण विंडो एसी स्वस्त असल्यामुळे विकत घेतात, पण विंडो एसीसाठी जास्त प्रमाणात वीज खर्च होते.
5 / 9
म्हणूनच तुम्ही तुमचा विंडो एसी काढून इन्व्हर्टर एसीमध्ये बदला किंवा ५ स्टार रेटिंगसह स्प्लिट एसी वापरा.
6 / 9
गिझरसाठी अनेक पर्याय - इलेक्ट्रिक गिझरसाठी जास्त प्रमाणात वीज खर्च होते. त्याऐवजी, तुम्ही वॉटर हिटिंग रॉड वापरू शकता.
7 / 9
इलेक्ट्रिक गिझरपेक्षा कमी वीज वापरतो आणि दुसऱ्या पर्यायामध्ये, तुम्ही इलेक्ट्रिक गिझरऐवजी गॅस गीझर देखील वापरू शकता.
8 / 9
किचनमधील फायरप्लेस- घरांमध्ये स्वयंपाकघरातील वायुवीजनासाठी चिमणीचा वापर केला जातो. यासाठीही खूप वीज खर्च होते आणि अनेक वेळा वापरकर्ते ते चालू आणि बंद करायला विसरतात, त्यामुळे वीज बिल जास्त येते.
9 / 9
म्हणूनच चिमणी त्वरित एक्झॉस्ट फॅनने बदलली पाहिजे. ते अधिक प्रभावी देखील आहे आणि त्यात वीज वापर देखील खूप कमी आहे.
टॅग्स :electricityवीजbillबिलtechnologyतंत्रज्ञान