शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : Reliance Jio चा डबल धमाका! जबरदस्त वर्क फ्रॉम होम प्लॅन आणि बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 6:37 PM

1 / 14
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. घरबसल्या इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जात आहे.
2 / 14
वर्क फ्रॉम होम, सिनेमा अथवा व्हिडीओ पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. डेटा लवकर संपल्यानंतर कंटाळा येतो. तसेच स्लो इंटरनेट आणि लिमिटेड डेटाच्या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत आहे.
3 / 14
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच भन्नाट रिचार्ज प्लॅन आणत असतं. यावेळीही जिओने धमाकेदार वर्क फ्रॉम होम प्लॅन लाँच केला आहे.
4 / 14
लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. वर्क फ्रॉम होमची गरज लक्षात घेऊन रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन लाँच केला आहे
5 / 14
रिलायन्स जिओनो एक प्री-पेड प्लॅन लाँच केला आहे. नव्या वर्क फ्रॉम होम प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवस दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे.
6 / 14
जिओच्या या नव्या प्लॅनसाठी ग्राहकांना 2,399 रुपये मोजावे लागणार आहेत. 365 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे.
7 / 14
वर्क फ्रॉम होम प्लॅनमध्ये डेटासोबतच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधाही ग्राहकांना देण्यात आली आहे.
8 / 14
2,399 किमतीच्या प्लॅनसह रिलायन्स जिओने आणखी एक जबरदस्त प्लॅन देखील लाँच केला आहे.
9 / 14
2,121 किमतीचा वर्क फ्रॉम होमचा आणखी एक प्लॅन असून या प्लॅनची व्हॅलिडीटी ही 336 दिवसांची आहे.
10 / 14
336 दिवस दररोज 1. 5 जीबी डेटा हा ग्राहकांना या प्लॅनमध्ये मिळणार आहे. यासोबतच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंगची देखील सुविधा आहे.
11 / 14
वर्क फ्रॉम होम प्लॅनसह जिओने आणखी काही भन्नाट डेटा प्लॅन्सही ग्राहकांसाठी आणले आहेत.
12 / 14
डेटा प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त डेटा मिळतो. 151 किमतीच्या प्लॅनमध्ये 30 जीबी डेटा मिळणार आहे.
13 / 14
जिओच्या 201 किमतीच्या प्लॅनमध्ये 40 जीबी डेटा तर 251 किमतीच्या प्लॅनमध्ये 50 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.
14 / 14
रिलायन्स जिओसह इतरही टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आहेत. त्याचा भारतीय युजर्सना मोठा फायदा होत आहे.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओJioजिओInternetइंटरनेटMobileमोबाइलcorona virusकोरोना वायरस बातम्या