BSNL च्या प्लॅनवर मिळतोय 6000 रुपयांचा बंपर डिस्काउंट; 'या' तारखेपर्यंत घ्या फायदा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:29 IST2025-08-18T14:26:29+5:302025-08-18T14:29:51+5:30

BSNL Fiber Ruby OTT Plan: ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.

Reliance Jio आणि Airtel प्रमाणे सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL देखील आपल्या ग्राहकांना उत्तमोत्तम ऑफर देत राहते. तुम्हालाही घरी हाय-स्पीड ब्रॉडबँड कनेक्शन मिळवायचे असेल, तर BSNL ने अलीकडेच एक नवीन ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत कंपनी 1 GBPS स्पीड असलेल्या या प्लॅनवर 6000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट देत आहे. हा प्लॅन ऑफिस किंवा पीजीमध्ये राहणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

BSNL च्या फायबर रुबी ओटीटी प्लॅनवर 6000 रुपयांची सूट मिळत आहे. नियमित इंटरनेट वापरकर्त्यांना हा प्लॅन महाग वाटू शकतो, परंतु हा प्लॅन ऑफिस आणि पीजीसाठी परिपूर्ण आहे.

टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, पहिल्या ६ महिन्यांसाठी या प्लॅनमध्ये ग्राहकांना दरमहा 1000 रुपयांची सूट मिळेल. याचा अर्थ, पहिल्या 6 महिन्यांसाठी तुम्हाला हा प्लॅन 4799 नाही, तर 3799 रुपयांमध्ये मिळेल.

1 जीबी प्रति सेकंद स्पीड देणाऱ्या या प्लॅनसह तुम्हाला कंपनीकडून दरमहा 9500 जीबी हाय स्पीड इंटरनेट दिले जाईल. याशिवाय, या प्लॅनमध्ये काही प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा देखील मिळतो. 1 जीबीपीएस स्पीडसह बीएसएनएल प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार, सोनीलिव्ह प्रीमियम, लायन्सगेट, झी5 प्रीमियम, शेमारु आणि इतर ओटीटी अॅप्स मिळतात.

महत्वाची बाब म्हणजे, बीएसएनएलची ऑफर मर्यादित काळासाठी आहे. तुम्ही १५ ऑगस्ट २०२५ पासून १३ सप्टेंबर २०२५ पर्यंत ही ऑफर घेऊ शकता. या ऑफरचा फायदा फक्त निवडक बीएसएनएल सर्कलमध्ये उपलब्ध आहे.

तुम्हालाही ही ऑफर आवडली असेल, तर तुम्ही बीएसएनएल कस्टमर केअर किंवा जवळच्या बीएसएनएल ऑफिसला भेट देऊन ऑफरशी संबंधित अधिक माहिती मिळवू शकता.