काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी
By सिद्धेश जाधव | Updated: January 6, 2022 19:04 IST2022-01-06T18:51:35+5:302022-01-06T19:04:05+5:30
Best Smartphone Under 6000: जर तुम्हाला नव्या वर्षात नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेटमुळे तुम्ही मागे पुढे करता असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत.

या यादीत 6,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीती येणाऱ्या ब्रँडेड स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे. यात सॅमसंग, itel, मायक्रोमॅक्स, लावा अशा कंपन्यांचे फोन्स आहेत. जे कमी किंमतीत शानदार फीचर्स देतात.
Lava Z61 Pro
Lava Z61 Pro स्मार्टफोन अॅमेझॉनवर 5,999 रुपयांमध्ये विकत घेता ययेईल. यात 2GB RAM आणि 16 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. अँड्रॉइड 10 वर चालणारा हा फोन 5.45 इंचाच्या डिस्प्लेसह बाजारातआला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कंपनीनं यात 3100mAh ची बॅटरी दिली आहे.
Samsung M01 Core
Samsung M01 Core चा 16GB रॅम व्हेरिएंट रिलायन्स डिजिटलमध्ये 5,199 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 5.30 इंचाचा डिस्प्ले, 1GB RAM आणि 16GB स्टोरेज मिळते. अँड्रॉइड गो एडिशनवर चालणारा हा फोन 8 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 5 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह यात 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Itel A25 Pro
Itel A25 Pro खरेदी करण्यासाठी अॅमेझॉनवर 4,899 रुपये मोजावे लागतील. 5.00 इंचाचा डिस्प्ले असलेला हा फोन 3020mAh बॅटरीसह बाजारात आला आहे. फोनच्या मागे 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे तर फ्रंटला 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Micromax iOne
Micromax iOne ची किंमत फ्लिपकार्टवर 5999 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यात 2जीबी रॅमसह 16जीबी मेमरी मिळते. यात 5.45 इंचाचा एचडी डिस्प्ले, 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 2200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
itel A23 Pro
Itel A23 Pro स्मार्टफोन रिलायन्स डिजिटलवर 4040 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 5.0 इंचाच्या डिस्प्लेसह येणारा हा फोन अँड्रॉइड 10.0 Go Edition वर चालतो. यात 1GB RAM आणि 8GB इंटरनल स्टोरेज मिळते. यात मागे 2 मेगापिक्सलचा तर फ्रंटला 0.3 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कंपनीनं यात 2400mAh ची बॅटरी दिली आहे.