जबरदस्त! Asus ROG Phone 5 लॉन्च; १८ जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन 888 प्रोससर, पाहा संपूर्ण डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:32 PM2021-03-11T16:32:14+5:302021-03-11T16:37:28+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित Asus ROG Phone 5 लॉन्च झाला आहे. Asus हा फोर्थ जनरेशनचा गेमिंग स्मार्टफोन आहे. (asus rog phone 5 launched in India and know about price features and specification)

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित Asus ROG Phone 5 लॉन्च झाला आहे. गेमिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये अनेक अत्याधुनिक गोष्टी देण्यात आल्या आहेत. तसेच अनेक गेमिंग करताना काही गोष्टी कस्टमाइज करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

Asus हा फोर्थ जनरेशनचा गेमिंग स्मार्टफोन आहे. यापूर्वी कंपनीने ROG Phone 3 लॉन्च केला होता. मात्र, ROG 4 न काढता थेट ROG Phone 5 लॉन्च करण्यात आला आहे. भारतातही हा फोन उपलब्ध होणार आहे.

Asus ROG Phone 5 हा गेमिंग स्मार्टफोन ASUS_I005DA या नावाने लिस्टेट झाला होता. तसेच या गेमिंग स्मार्टफोनमध्ये १८ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 888 चा प्रोसेसर देण्यात आला आहे.

Asus ROG Phone 5 स्टँडर्ड, प्रो आणि अल्टिमेट या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. स्टँडर्ड गेमिंग स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे.

Asus ROG Phone 5 स्टँडर्टमध्ये आणखी एक पर्याय देण्यात आला असून, यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. तर, Asus ROG Phone 5 प्रोमध्ये ६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Asus ROG Phone 5 ची एल्टिमेट एडिशनही उपलब्ध होणार असून, यामध्ये युझर्सना तब्बल १८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळणार आहे. यापूर्वी केवळ न्यूबिया या कंपनीने १८ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन सादर केला होता.

Asus ROG Phone 5 ची स्टँडर्ड एडिशनची किंमत ४९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. यातील १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत ५७,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

Asus ROG Phone 5 च्या प्रो व्हेरिअंटची किंमत ६९,९९९ रुपये असून, अल्टिमेट एडिशनची किंमत ७९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच हा गेमिंग स्मार्टफोन आता दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.

Asus ROG Phone 5 हा गेमिंग स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालणार आहे. Asus ROG Phone 5 या गेमिंग स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला असून, 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Asus ROG Phone 5 ची स्पर्धा iphone 12 शी असेल, असे सांगितले जात आहे.

Asus ROG Phone 5 या स्मार्टफोनच्या अल्टिमेट एडिशनमध्ये बॅक साइला डिस्प्ले देण्यात आल्याचे समजते. Asus ROG Phone चे मागील दोन स्मार्टफोन्स गेमर्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. Asus ROG Phone 5 मध्ये अल्ट्रासॉनिक बटण देण्यात आले असून, यामुळे गेमिंग एक्स्पिरिअन्स अधिक चांगला होईल, असे सांगितले जात आहे.

फ्लिपकार्टवर १५ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून Asus ROG Phone 5 ची विक्री सुरू होणार आहे. विशेष म्हणजे Asus ROG Phone 5 ला ३.५ एमएमचा जॅक देण्यात आला आहे. Asus ROG Phone 3 मध्ये तो काढण्यात आला होता. त्यामुळे अनेक युझर्स नाराज झाले होते. त्यामुळे Asus ROG Phone 5 ला पुन्हा ३.५ एमएम जॅक देण्यात आला आहे.

Asus ROG Phone 5 मध्ये AirTrigger 5, डुअल फ्रंट-फायरिंग स्पीकर्स, मल्टी-अँटिना वाय-फाय और क्वॉड-माइक नॉइस कॅन्सिलिंग सिस्टीम देण्यात आली आहे. Asus ROG Phone 5 रिअरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि २४ मेगापिक्सला फ्रंट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.