अँड्रॉइड की अॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:34 IST2025-10-31T14:58:26+5:302025-10-31T15:34:12+5:30
सध्या मोबाईलवर घोटाळ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक जण घोटाळे रोखण्यात अँड्रॉइड स्मार्टफोन की अॅपलचे फोन चांगले यावर चर्चा सुरू असते. गुगलने याबाबत मोठा खुलासा केलाय.

सध्या मोबाईल वापरकर्त्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मोबाईलवरुन बँकिंग सेवाही वापरली जाते. यामध्ये आता मोबाईल घोटाळ्यांचे प्रमाणही वाढले आहे. गुगलने याबाबत एका मोठा दावा केला आहे. मोबाईल घोटाळे रोखण्यात अँड्रॉइड स्मार्टफोन अॅपलपेक्षा चांगले काम करत असल्याचे गुगलने म्हटले आहे.

एका सर्वेक्षण आणि संशोधनाचा हवाला देत गुगलने हा दावा केला आहे. एआय-सक्षम संरक्षण वापरकर्त्यांना फसवणूक आणि अवांछित संप्रेषणापासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे गुगलने म्हटले आहे.

'अँड्रॉइडमध्ये असलेले एआय टूल्स वापरकर्त्यांना जागतिक घोटाळ्याच्या समस्येशी लढण्यास मदत करत आहेत. अँड्रॉइडने अंदाजे 400 अब्ज डॉलर वाचवले आहेत.

अँड्रॉइड सिक्युरिटी कॉल सिस्टम दरमहा 10 अब्जाहून अधिक स्पॅम कॉल आणि संदेश ब्लॉक करते, असे एका ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने म्हटले आहे.

या अहवालात अंदाजे ५,००० स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या YouGov सर्वेक्षणाचाही उल्लेख आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना, विशेषतः पिक्सेल डिव्हाइस वापरकर्त्यांना आयफोन वापरकर्त्यांपेक्षा कमी स्पॅम कॉल आणि संदेश मिळतात, असा दावा यामध्ये केला आहे.

या सर्वेक्षणानुसार, गेल्या आठवड्यात iOS वापरकर्त्यांपेक्षा अँड्रॉइड वापरकर्त्यांना कोणतेही घोटाळे संदेश न मिळण्याची शक्यता ५८ टक्के जास्त होती. आयफोन वापरकर्त्यांपेक्षा पिक्सेल वापरकर्त्यांना ९६ टक्के जास्त होती. iOS वापरकर्त्यांना दर आठवड्याला तीन किंवा त्याहून अधिक घोटाळे संदेश मिळतात असेही त्यात उघड झाले.

अँड्रॉइड डिव्हाइस मेसेजेसमधील स्पॅम फिल्टरिंग, डिव्हाइसवरील स्कॅम डिटेक्शन यासारख्या बिल्ट-इन टूल्सद्वारे संभाव्य फसवणूक ओळखू शकतात आणि अँड्रॉइड फोन अॅपमधील कॉल स्क्रीन फीचर आधीच स्पॅम कॉल ओळखण्यास सक्षम आहे.

















