Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 21:46 IST2025-08-14T21:06:14+5:302025-08-14T21:46:35+5:30

Aadhaar Card : UIDAI लवकरच ई-आधार अ‍ॅप लाँच करत आहे. याद्वारे तुम्ही घरी बसून तुमच्या फोनवरून नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख यासारखी माहिती अपडेट करू शकता.

आता आधार अपडेटसाठी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यासाठी आपल्याला आधार केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही. UIDAI लवकरच त्यांचे नवीन ई-आधार मोबाईल अॅप लाँच करत आहे, यावरुन तुम्ही तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि जन्मतारीख थेट तुमच्या स्मार्टफोनवरून अपडेट करू शकता.

या अ‍ॅपचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात फेस आयडी, एआय व्हेरिफिकेशन आणि क्यूआर-कोड आधारित डिजिटल आयडेंटिफिकेशन सिस्टम आहे जे ते जलद, विश्वासार्ह आणि आधुनिक बनवते. यूआयडीएआयच्या सीईओच्या मते, या अ‍ॅपच्या मदतीने आधार कार्ड अॅक्सेस करणे सोपे होईल आणि फसवणुकीचा धोका कमी होईल.

अॅपद्वारे, तुम्ही डिजिटल किंवा मास्क केलेले आधार शेअर करू शकता, यामुळे फोटोकॉपीची गरज राहणार नाही.

पासवर्ड किंवा ओटीपीऐवजी, तुमचा चेहरा अॅपमध्ये लॉगिन जलद आणि सुरक्षित करेल. नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर आता काही टॅप्समध्ये अॅपमध्ये अपडेट केले जातील. आता फॉर्म आणि कागदपत्रे भरण्याची गरज नाही.

नोव्हेंबर २०२५ पासून, फक्त बायोमेट्रिक अपडेटसाठी (फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन) आधार केंद्रात जावे लागेल. इतर सर्व अपडेट फक्त अॅपद्वारे करता येतील. नोव्हेंबर २०२५ पासून ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल. वापरकर्त्यांना फक्त एक ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) आवश्यक असेल, याद्वारे ते घरबसल्या त्यांचे आधार कार्ड तपशील अपडेट करू शकतील.

या नवीन प्रक्रियेचा ग्रामीण भागातील लोकांना फायदा होईल. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आधार केंद्र नसतात.

सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आधार कार्डमध्ये कोणतेही बदल करायचे असतील, मग ते नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर असो, तर त्याला आधार केंद्रात जाणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रकारच्या अपडेटसाठी प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे.

काही विशेष प्रकरणांमध्ये, जसे की बायोमेट्रिक माहिती बदलणे किंवा आयरिस स्कॅन करणे, यासाठी आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. परंतु पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलणे यासारखे सामान्य अपडेट्स आता नवीन प्रणालीद्वारे घरबसल्या करता येतील.