९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:14 IST2026-04-08T19:10:27+5:302026-04-08T19:14:01+5:30
OnePlus Nord 6 Launched in India: स्मार्टफोन की पॉवरबँक? वनप्लस नॉर्ड ६ भारतात लॉन्च झाला असून या फोनमध्ये अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत.

डिस्प्ले आणि डिझाइन: फोनमध्ये ६.७८ इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले असून तो १६५Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी यात मिलिटरी ग्रेड मजबूती आणि IP69K वॉटर रेझिस्टन्स रेटिंग देण्यात आले आहे.

कॅमेरा सेटअप: फोटोग्राफीसाठी यात ५० MP चा Sony LYT-600 मुख्य कॅमेरा (OIS सह) आणि ८ MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ३२ MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत आणि व्हेरिएंट: हा फोन दोन पर्यायांत उपलब्ध आहे. ८GB + २५६GB व्हेरिएंटची किंमत ३८,९९९ रुपये, तर १२GB + २५६GB व्हेरिएंटची किंमत ४१,९९९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

शक्तिशाली प्रोसेसर: OnePlus Nord 6 मध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 4 हा प्रगत चिपसेट वापरण्यात आला आहे. गेमिंगचा अनुभव सुधारण्यासाठी यात खास टच रिफ्लेक्स चिप आणि १६५ FPS पर्यंतचा फ्रेम रेट देण्यात आला आहे.

बॅटरी क्षमता: या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची ९,००० mAh क्षमतेची बॅटरी. एका चार्जवर ही बॅटरी अडीच दिवसांपर्यंत टिकू शकते, असा दावा करण्यात आला असून यासोबत ८०W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

उपलब्धता: या स्मार्टफोनची विक्री ९ एप्रिल २०२६ पासून Amazon India आणि वनप्लसच्या अधिकृत स्टोअर्सवर सुरू होणार आहे. हा फोन क्विक सिल्वर, फ्रेश मिंट आणि पिच ब्लॅक अशा तीन रंगांत उपलब्ध असेल.

















