शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Man lift his scooty on shoulder : बोंबला! रस्त्यात पेट्रोल संपलं अन् पैसेही नव्हते; म्हणून खांद्यावर स्कुटी घेऊन निघाला पठ्ठ्या, पाहा व्हायरल फोटो

By manali.bagul | Published: March 02, 2021 4:27 PM

1 / 7
देशभरात सध्याच्या काही दिवसात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांमध्ये असंतोष आणि संतापाची भावना पाहायला मिळत आहे. अनेकांना गाडीत पेट्रोल भरणं परवडेनासं झालं आहे.
2 / 7
पेट्रोलच्या भाववाढीला वैतागलेल्या एका तरूणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुरेसं पेट्रोल भरण्यासाठी या माणसाकडे पैसै नसावेत म्हणून त्यानं स्कुटी खांद्यावर घेण्याचं ठरवलं असावं
3 / 7
हिमाचल प्रदेशातील कुल्लुमध्ये एक आगळीवेगळी घटना घडली आहे. या माणसानं पेट्रोल संपलं म्हणून स्कुटी रस्त्यावर सोडून न जाता खांद्यावर धरून हे जड वजन उचलून नेण्याचा प्रयत्न करत आहे.
4 / 7
. या फोटोतील व्यक्ती कोण आहे? हा व्हिडीओ कधीचा आहे. याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
5 / 7
खरंच पेट्रोलच्या भावावाढीमुळे या माणसाचं बिनसलंय की गाडी खराब झालीये याबाबत अद्याप काहीही समजलेलं नाही.
6 / 7
सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. पेट्रोलचा भाव १०० रुपयांवर गेल्यामुळे रागात या व्यक्तीनं आपली स्कुटी खांद्यावर उचलल्याचे अनेकजण म्हणत आहेत.
7 / 7
लोक या माणसाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.या माणसाचे फोटो पाहून अनेकांचे डोळे उघडेच राहिले आहेत.
टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपSocial Viralसोशल व्हायरलHimachal Pradeshहिमाचल प्रदेश