By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:00 IST
1 / 8प्रसिद्ध लक्झरी वॉचमेकर जॅकब अँड कंपनीने या प्रकल्पाला ट्रिब्यूट देण्यासाठी त्यांचे अत्यंत खास ओपेरा वनतारा ग्रीन कॅमो हे घड्याळ २१ जानेवारी रोजी लाँच केले आहे.2 / 8या घड्याळाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचं डायल. हे डायल एखाद्या थिएटरसारखं दिसतं, ज्यामध्ये हाताने बनवलेल्या सूक्ष्म कलाकृती आहेत. घड्याळाच्या आत अनंत अंबानी निळ्या फ्लोरल शर्टमध्ये बसलेले दिसतात.3 / 8त्यांच्यासोबत अत्यंत सजीव दिसणारा सिंह आणि बंगाल टायगरच्या सूक्ष्म मूर्ती आहेत. वृत्तानुसार, यामध्ये सोन्याने कोरलेला एक हत्ती आणि त्यावर 'Vantara' असे नाव देखील कोरण्यात आले आहे.4 / 8या घड्याळाची किंमत जवळपास १.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १२.५ कोटी रुपये आहे. हे घड्याळ एखाद्या दागिन्यापेक्षा कमी नाही. यात २१.९८ कॅरेटचे एकूण ३९७ मौल्यवान खडे जडवण्यात आले आहेत.5 / 8'जंगल' लूक देण्यासाठी यात हिरव्या रंगाचे डिमेंटोइड गार्नेट, सावोराइट्स, हिरवे नीलम आणि पांढऱ्या हिऱ्यांचा वापर करून कॅमफ्लाज इफेक्ट देण्यात आला आहे.6 / 8हे घड्याळ जॅकब अँड कंपनीच्या प्रसिद्ध 'ओपेरा' कलेक्शनचा भाग आहे. यात एक विशेष म्युझिक बॉक्स बसवण्यात आला आहे. बटन दाबताच त्यातून संगीत वाजते आणि घड्याळाचे संपूर्ण डायल फिरू लागते. घड्याळ निर्मितीच्या जगात हे तंत्रज्ञान अत्यंत गुंतागुंतीचे मानले जाते.7 / 8जेकब अँड कंपनीने यापूर्वी भारत आणि अंबानी कुटुंबाशी संबंधित खास घड्याळे तयार केली आहेत. कंपनीने राम जन्मभूमी एडिशन घड्याळ देखील सादर केले, जे अनेक प्रमुख सेलिब्रिटींनी घातले होते.8 / 8गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्सच्या रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये ३,५०० एकरवर पसरलेले 'वनतारा' हे जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव पुनर्वसन केंद्रांपैकी एक आहे. तिथे १.५ लाखांहून अधिक प्राणी राहतात. या केंद्रात १ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेले प्राण्यांचे खास रुग्णालय आहे, जिथे हत्तींसाठी एमआरआय आणि सीटी स्कॅन सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.