कूल प्रवासासाठी सुपरकूल फंडे; चालकांचे हे जुगाड पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 21:06 IST2019-05-21T21:01:20+5:302019-05-21T21:06:42+5:30

अहमदाबादमधील एका महिलेनं संपूर्ण कारला शेण थापलं आहे.
सध्या या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रुपेश गौरांग दास नावाच्या व्यक्तीनं फेसबुकवर शेण थापलेल्या कारचे फोटो शेअर केले आहेत. गायीच्या शेणाचा मी पाहिलेला सर्वोत्तम वापर, असं दास यांनी लिहिलं आहे.
. तेलंगणातही जग्वार कारचा अशाच प्रकारे जुगाड करून उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न झाला आहे.
गाडीला उन्हाची झळ बसणार नाही. यासाठी गवताच्या पेंडीनं एकानं कार झाकली आहे.
विशेष म्हणजे त्यानं गाडीच्या छतावर चांगल्या पद्धतीनं या पेंड्या बांधल्या आहेत. तसेच या पेंड्यांवर उन्हातून पाणी मारण्यात येते, जेणेकरून गाडीत थंडावा राहील.