शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, VIDEO मधून उघड झाले गुपित, पत्नीने उचलले टोकाचे पाऊल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 5:12 PM

1 / 8
बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात पती अडसर ठरु लागल्याने पत्नीने पतिला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पती कामानिमित्त बाहेर गेला होता, दरम्यान पत्नी तिच्या मित्रासोबत फिरत होती.
2 / 8
दोघेही एका पार्कमध्ये फिरत होते. यादरम्यान या दोघांचा कोणीतरी व्हिडिओ बनवला आणि तो तिच्या पतीच्या फोनवर पाठवला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पती पुन्हा घरी परतला, आणि या कृत्याबाबत पतीने पत्नीला विचारणा केली, यावेळी पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचे डोके फुटले.
3 / 8
हे प्रकरण बिहारच्या नवादा जिल्ह्यातील आहे, तिथे ही घटना घडली.
4 / 8
ही घटना बिहारच्या नवादा येथील आहे. तिथे पत्नीला आपल्याच मित्रासोबत पिरत असताना पाहून पती संतापला आणि पत्नीवर आरोप सुरू केले. यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. जखमी पतीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
5 / 8
सध्या पती टिंकु कुमार रुग्णालयात उपचार घेत आहे. 'आमचे २०१४ मध्ये लग्न झाले होते आणि मी दिल्लीत नोकरी करत होतो. या दरम्यान माझा मित्र करण मिस्त्री माझ्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत माझ्या घरी येत- जात होता.
6 / 8
दोघेही बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसारखे वागू लागले आणि अनेकदा एकत्र बाहेर जाऊ लागले. दरम्यान, पार्कमध्ये फिरत असतानाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर पत्नीने त्याला आक्षेप घेत मारहाण केली.
7 / 8
या प्रकरणी माहिती देत असताना पती भावूक झाला होता. 'आता कोणाकडे तक्रार करावी हे समजत नाही, असंही पतीने म्हटले आहे. कुटुंबाची काळजी घेण्यास सांगितलेल्या मित्राने त्याचा विश्वासघात केला. असे असतानाही आपल्यासोबत पुन्हा मारहाणीची घटना घडू नये, यासाठी त्याने सुरक्षेसाठी पोलिसांकडे अर्ज केला आहे.
8 / 8
या घटनेबाबत परिसरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. कोणी पत्नीवर आरोप करत आहेत. कोणी मित्रावर आरोप करत आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट