1 / 8पाण्याच्या टाकीवर चढल्यानंतर 'कूद जाऊंगा', असा डायलॉग तुम्ही वीरूच्या तोंडून ऐकला असेल. पण प्रत्यक्षात तुम्ही कधीही असा स्टंट पाहिला नसेल. उत्तरप्रदेशातील रामपूरमधून अशीच घटना समोर आली आहे. 2 / 8घरगुती भाडंणांना कंटाळून एक माणूस आपल्या ४ वर्षांच्या एका चिमुरडीला घेऊन मोबाईवर टॉवरवर चढला. 3 / 8घटनेची माहिती मिळताच अधिकारी त्याठिकाणी पोहोचले आणि या माणसाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. 4 / 8त्यानंतर हा माथेफिरू जमिनीवर उतरला. हा हाय व्हॉटेज ड्रामा पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. 5 / 8आपली पत्नी आणि तिच्या अनैतिक संबंधांना हा माणूस कंटाळला होता. त्यामुळे घरात वारंवार भांडणं व्हायची. रोजच्या भांडणांना वैतागून या माणसानं हे मोठं पाऊल उचललं. 6 / 8आधी एकदा या माणसानं पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी समाधानकारक कारवाई केली नाही. म्हणून या माणसाला काय करावं कळत नव्हतं. त्याची मनस्थिती व्यवस्थित नव्हती. 7 / 8या घटनेनंतर मुलीच्या जीवाशी खेळल्याप्रकरणी पोलिसांना या माणसाला ताब्यात घेतलं आहे. इतकंच नाही तर पोलिसांना या माणसाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. 8 / 8रामपूर सीईओ धर्मपाल मार्छाल यांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरूण टांडा पोलिस स्थानक परिसरात राहतो. घटनास्थळी आम्ही पोहोचल्यानंतर हा माणूस आपल्या चिमुरडीला आधी खाली फेकून स्वतः उडी मारण्याच्या तयारीत होता. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत मुलीला आपल्या आईकडे सुपूर्त केलं आणि तेवढ्यापुरती समजून काढून मग कारवाई केली.