Photos : मावळत्या सूर्यासोबत असा काही खेळला खेळ, जगभरात प्रसिद्ध झाला भारतीय फोटोग्राफर
By अमित इंगोले | Updated: October 22, 2020 12:59 IST2020-10-22T12:50:02+5:302020-10-22T12:59:06+5:30
जर तुमचं कलेवर प्रेम असेल तर तुम्ही सुद्धा हे सुंदर फोटो पाहून मंत्रमुग्ध व्हाल. सूर्यासोबत खेळतानाचे हे फोटो एका भारतीय फोटोग्राफरने काढले आहेत.

असे म्हणतात की, कलाकाराची ओळख त्याच्या क्रिएटिव्हीटीने होत असते. अशीच वेगळी क्रिएटिव्हीटी दाखवून भारतातील एका फोटोग्राफरची आतंरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. हरयाणातील रेवाडीमध्ये राहणारा २१ वर्षीय सुलभ लांबाने आपल्या कॅमेरा अशी काही कमाल करून दाखवली आहे की, त्याचं कौतुक परदेशातही केलं जात आहे.
सुलभने मावळत्या सूर्यासोबत काढलेले काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचे इन्स्टाग्रामवर २० हजार फॉलोअर्स असून तो स्वत:ला व्हिज्युअल आर्टिस्ट असल्याचं सांगतो. याआधी एखाद्या आर्टिस्टने सूर्यासोबत अशी कमाल केलेली बघायला मिळाली नाही.
जर तुमचं कलेवर प्रेम असेल तर तुम्ही सुद्धा हे सुंदर फोटो पाहून मंत्रमुग्ध व्हाल. सूर्यासोबत खेळतानाचे हे फोटो एका भारतीय फोटोग्राफरने काढले आहेत.
सुलभच्या या फोटोचं कौतुक देशात तर होतच आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशातील कलाप्रेमीही त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.
यात एक व्यक्ती चक्क सूर्यासोबत खेळताना दिसत आहे. जणू असं वाटतं सूर्य त्याने हातात घेतलाय.
मोर आणि सूर्याचा हा फोटो तर कमाल दिसतो. या फोटोसोबत सुलभने अहमद फराजची एक ओळ शेअर केली आहे. 'चढते सूरज के पुजारी तो लाखो है साहब, डूबते वक्त हमने सूरज को भी तनहा देखा है!.
आपल्या या फोटोंबाबत सुलभने सांगितले की, 'मी चार वर्षापूर्वी सनसेटचे क्रिएटीव्ह फोटो काढणे सुरू केले होते. या फोटोंसाठी मी Nikon D5300 कॅमेराचा वापर केलाय'.