शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संतापजनक! पाकिस्तानी अभिनेत्रीने शेअर केला फोटो, यूजर्समध्ये पेटला तिच्या अंतर्वस्त्राच्या रंगावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 13:45 IST

1 / 10
मेहविश हयात पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मेहविशने अनेक पाकिस्तानी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावरही मेहविशची मोठी फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ४.३ मिलियन फॉलोअर्स आहेत.
2 / 10
पण नुकतीच मेहविशसोबत अशी घटना घडली जी फार संतापजनक आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव राहणारी मेहविशने स्वातंत्र दिवसानिमित्त पाकिस्तानचा झेंडा घेऊन एक फोटो शेअर केला होता. फोटोसोबत मेहविश देशातील लोकांसाठी एक खास मेसेज लिहिला होता.
3 / 10
मेहविशने लिहिले होते की, सर्व पाकिस्तानी लोकांनी त्यांच्या पूर्वजांच्या आदर्शांना अवलंबण्यावर जोर दिला होता. पण काही लोकांनी तिच्या मेसेजवर लक्ष देण्याऐवजी तिचा फोटो बघून तिच्या ब्राच्या रंगावर वाद घालणं सुरू केलं.
4 / 10
फोटोत तुम्ही बघू शकता की, मेहविश व्हाइट कुर्त्यात आहे. तिच्या हाती पाकिस्तानचा झेंडा आहे. पण काही संकुचित विचार करणाऱ्या लोकांनी तिच्या मेसेजवर आणि आपल्या झेंड्यावर लक्ष देण्याऐवजी यावर चर्चा सुरू केली की, तिच्या ब्रा चा रंग कोणता आहे?
5 / 10
मेहविशने फोटो पोस्ट केल्यावर तिच्या फोटोवर अनेक घाणेरड्या कमेंट्स येणं सुरू झालं. याबाबत मेहविशने एका इन्स्टा स्टोरीवरून नाराजी व्यक्त केली.
6 / 10
मेहविशने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले की, 'या पोस्टवर आलेल्या काही कमेंट्स पाहून डोकं खराब झालंय. निर्लज्ज आणि बिघडलेले लोक माझ्या ब्रा च्या रंगावरून वाद घालत आहेत. यावरून त्यांचे विचार किती खालचे आहेत हे दिसतं. ब्लॅक, ग्रे किंवा ग्रीन. हा तुमचा विषय नाही. ग्रो अप'.
7 / 10
मेहविशने दुसऱ्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले की, 'मला हे सांगायचं आहे की समाजात आणखीही मोठे मुद्दे आहेत. ज्यावर लक्ष देण्याची गरज आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ही एनर्जी चांगल्या गोष्टींसाठी खर्च केली जाईल'.
8 / 10
मेहविश हयातने आपल्या करिअरची सुरूवात २०१० मध्ये केली होती. ती पाकिस्तानात फार लोकप्रिय आहे.
9 / 10
रिपोर्टनुसार, मेहविशचं नाव दाउद इब्राहिमसोबतही जोडलं गेलं आहे. पण त्या किती तथ्य आहे हे सांगणं कठिण आहे.
10 / 10
रिपोर्टनुसार, मेहविशचं नाव दाउद इब्राहिमसोबतही जोडलं गेलं आहे. पण त्या किती तथ्य आहे हे सांगणं कठिण आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया