शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: चॅलेंज! हे सहा फोटो पहाल तर तुमचे डोके हलेल, गरगरेल; डोळेच नाही तर मेंदूही खाईल धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:24 IST

1 / 8
ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच तुम्हाला जे दिसते तसे नसते, डोळ्यांसोबतच तुमच्या मेंदूशीही धोका होतो. तुम्ही एवढे कन्फ्यूज होता की हे असे कसे होऊ शकते असे तुम्हाला वाटू लागते. मात्र, थोड्या वेळाने तुम्ही जेव्हा स्थिर होता, तेव्हा तुमच्या लक्षात येऊ लागते. यामुळेच सोशल मीडियावर सध्या अशा फसव्या फोटोंचा धुमाकूळ सुरु आहे.
2 / 8
आता या फोटोत पहा ना, हत्तीने धुमाकुळ घातला आहे. त्याला किती पाय आहेत? कुशाग्र बुद्धीच्या कलाकाराने हे चित्र बनविले आहे. या फोटोत एकच पाय योग्य पद्धतीने दिसत आहे, अन्य पाय नीट दिसत नसल्याने त्याला पाच पाय असल्याचे दिसत आहे.
3 / 8
एका युजरने हा फोटो शेअर करत तुमच्या मेंदूची उजवी, डावी बाजू कसे काम करते त्यावरून तुम्हाला या फोटोत प्राणी दिसतील. खरेतर या फोटोत प्राणी नाहीएत परंतू तुम्हाला एका बाजुला मांजर आणि दुसऱ्या बाजुला हरणासारखा प्राणी दिसेल. हे एक तुमच्या मेंदू आणि डोळ्यांनी पाहिलेले ऑप्टिकल इल्यूजन आहे. काहींना ते दिसणारही नाही.
4 / 8
पानगळीच्या मोसमातील हा सुंदर फोटो आहे. या फोटोत एक मॉडेल लपलेली आहे. जिला पाहणे सर्वांच्याच नजरेत नाही. आर्टिस्ट जोर्ग डस्टरवाल्डने जर्मनीच्या लोअर सॅक्सनीमधील जंगलात हा फोटो टिपला आहे, त्यात नादिन नावाची मॉडेल आहे.
5 / 8
या फोटोत तुम्हाला गाढवाचे तोंड दिसत असेल. मात्र, एका बाजुने पाहिले तर मासा दिसेल आणि दुसऱ्या बाजुने पाहिले तर जलपरी. अनेकांना यात गाढव दिसते.
6 / 8
या फोटोने नेटकऱ्यांना खूपच कन्फ्यूज केले आहे. बॉटल पाहिल्या तर पहिल्या नजरेत वाटते की या फोटोत चार लोक आहेत. परंतू हात केवळ तीनच दिसत आहेत. चौथ्याचा हात कुठेय?
7 / 8
चौथ्याचा हात जमिनीच्याच रंगाचे जॅकेट असल्याने दिसत नाहीय.
8 / 8
हा फोटो पाहूनही लोक खूप भ्रमित झाले आहेत. हा फोटो पाहून वाटतेय मुलगी कोणत्यातरी खड्ड्यात आहे. परंतू एका गार्डनमध्ये वरच्या बांधावरून फोटो काढल्याने तसे दिसत आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल