अरे व्वा! महाकुंभमधील मोनालिसाचा नवा लूक पाहिलात का?, सुंदर फोटो जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:44 IST2025-02-11T16:36:48+5:302025-02-11T16:44:24+5:30

मोनालिसा माळा विकण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत महाकुंभमध्ये आली होती.

महाकुंभमध्ये आलेल्या एका सुंदर डोळ्यांच्या तरुणीने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं. ती तरुणी म्हणजे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली मोनालिसा.

व्हायरल गर्लची जोरदार चर्चा रंगली. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळेच पुढे तिच्यावर कुंभमेळा सोडण्याची वेळ आली.

महाकुंभमध्ये माळा विकणाऱ्या या मोनालिसाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिचा पाठलाग करायला सुरुवात केली.

मध्य प्रदेशची रहिवासी असलेली मोनालिसा माळा विकण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत महाकुंभमध्ये आली होती.

व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाचं नशीब आता फळफळलं आहे. तिला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या आहेत.

मोनलिसाचे सुंदर फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत. तिचा नवा लूक पाहिल्यावर तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे.

प्रयागराज महाकुंभातील सर्वात चर्चेत आणि लक्ष वेधून घेणारी मोनालिसा तिचा आगामी चित्रपट 'द मणिपूर डायरी'च्या शूटिंगसाठी महेश्वरहून मुंबईला रवाना झाली आहे.

चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा स्वतः तिला घेण्यासाठी खरगोन जिल्ह्यातील महेश्वर येथे पोहोचले.

चित्रपटाच्या टीमने मोनालिसाच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी मोनालिसासोबत मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.