अशा चित्रविचित्र वस्तू पाहिल्या तर अंगाचा थरकाप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 14:17 IST2019-06-27T14:13:53+5:302019-06-27T14:17:04+5:30

आजच्या काळात प्रत्येक जण पाकिटाचा वापर करतो. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनविलेली पाकिटे लोकांकडून खरेदी केली जातात.
सोशल मिडीयावर सध्या अशा पर्सचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतोय. ही पर्स पाहून कोणालाही भीती वाटेल
ही पर्स आपण पाहिली तर तुम्हाला धक्का बसेल, माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे हुबेहुब ही पर्स बनविण्यात आली आहे. जो कोणी ही पर्स पहिल्यांदा पाहतो तो घाबरुन जोरजोरात ओरडतो.
तर दुसरीकडे माणसाच्या बोटासारखा बनविण्यात आलेला स्टँम्पही तुम्हाला बघायला मिळेल. चित्रविचित्र वस्तुंमुळे सध्या या गोष्टी सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
एवढचं नाही तर काही जणांनी पहिल्यांदा ही पर्स पाहिली आणि हातात घेऊन फेकून दिली. चिल्लर ठेवण्यासाठी ही पर्स बनविण्यात आली आहे. बघण्यासाठी हे विचित्र आहे पण काहीजण आकर्षितही होतात.