By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 13:22 IST
1 / 7जगभरासह भारतभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाला नष्ट करण्यासाठी तसंच कोरोनाच्या माहामारीला नाहीसं करण्याासाठी जगभरातील देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. 2 / 7कोरोनाची लस आणि औषध जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या उपायांनी कोरोनाला लांब कसं ठेवता येईल हे पाहीलं जातं आहे. असाच एक अनोखा प्रकार कोल्हापूरात पाहायला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील साळगाव इथल्या सचिन केसरकर या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांच्या माध्यमातून गो कोरोना गो चा संदेश दिला आहे.3 / 7या तरुण शेतकऱ्याने भात पिकाची लावण करताना ‘गो कोरोना गो’ अशी अक्षरं रेखाटली आहेत. त्याची ही अनोखी शक्कल आता सर्व विभागात चर्चेचा विषय ठरली आहे. 4 / 7आता लोकं ही अक्षर पाहायला सचिनच्या शेताला भेट देत आहेत. 5 / 7कोरोनाला पळवून लावण्यासाठी हिरव्यागार शेतात अशी अक्षरं काढल्याचं सचिनने सांगितले.6 / 7संपूर्ण जगाला कोरोनाशी लढण्यासाठी सचिनने या फोटोच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचे काम केले आहे. 7 / 7सगळ्यात आधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोना गोची घोषणा दिली होती. त्यानंतर देशभर ते ट्रोलही झाले होते. त्यानंतर गो कोरोना हा डायलॉग सगळ्यांच्याच तोंडी आला.