शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: लॉकडाऊन’मुळे शेकडो मजुरांची अन्नपाण्याविना पायपीट; ‘हे’ फोटो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 8:58 AM

1 / 10
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. रेल्वेसह सर्वच वाहतूक बंद करण्यात आली आहे.तर जिल्हा आणि राज्याच्या सीमा सुध्दा सील करण्यात आल्या आहे. त्यामुळे बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर अनेक जण मध्येच अडकले आहेत.
2 / 10
16 वर्षांचा मुलगा दिल्लीहून उत्तर प्रदेशमधील बदायूंकडे चालत आहेत, हे अंतर जवळपास 285 कि.मी. आहे. तो एका थेल्यावर काम करत असे. गुरुवारपासून त्याने काहीही खाल्लं नाही. असे बरेच लोक आहेत जे दिल्लीपासून अलीगढला जात आहेत. किमान खेड्यांमधील शेजारी मदत करतील अशी अपेक्षा त्यांना आहे.
3 / 10
या मजुरांच्या कुटुंबाला जेवण आणि पाणी मिळणंही कठीण झालं. लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल्स बंद होते. त्यामुळे न खाता-पिता यांची घराच्या दिशेने पायपीट सुरु आहे.
4 / 10
लॉकडाऊनमुळे या मजुरांच्या मालकांनी कामबंद केलं आहे. बुधवारी सांबरकाठा येथे हायवेवर मजूर आपल्या कुटुंबासह सामान घेऊन चालत जाताना दिसले.
5 / 10
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. खासगी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना घरीच बसावं लागत आहे. अशातच गुजरातच्या अहमदाबादेत असणाऱ्या हजारो मजूरांना चालत त्यांच्या राजस्थान येथील घरी जावं लागत आहे.
6 / 10
इटावा-कानपूर-आग्रा महामार्गावर. रोजंदारीवर काम करणारे मजूर दोन दिवस चालले आहेत. ते एका कारखान्यात काम करत होते, लॉकडाऊनमुळे कारखाना बंद असल्याचं त्यांनी सांगितले. त्यांनी कोविड १९ बद्दल ऐकले नाही. काम बंद झाल्याने मजूर खेड्याकडे पायपीट करत आहेत.
7 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात तीन आठवड्यांच्या लॉकडाउनची घोषणा केली. आतापर्यंत देशात ७७० कोरोनाचे रुग्ण आढळेलत तर २० जणांचा मृत्यू झाला आहे.
8 / 10
दरम्यान, विविध निर्बंध यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाची झळ बसणाऱ्या सुमारे ८० कोटी जनतेला अनेक प्रकारे मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपये खर्चाचे ‘पॅकेज’ बुधवारी जाहीर केले आहे.
9 / 10
घराबाहेर पडू नका, तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर एक लक्ष्मणरेषा ओढण्यात आली आहे. ती ओलांडू नका. घरातच राहावे. तुमचे घराबाहेर पडणारे एक पाऊल, काही लोकांच्या निष्काळजीपणाने, काहींच्या गैरसमजुतीने, तुम्हाला, तुमच्या मुला-बाळांना, आई-वडिलांना, तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि पूर्ण देशाला अत्यंत कठीण स्थितीत नेईल असं पंतप्रधानांनी सांगितले आहे.
10 / 10
गरीब कल्याण अन्न योजना : याआधी रेशनवर दिलेल्या पाच किलो गहू किंवा तांदळाखेरीज पुढील तीन महिने प्रत्येक व्यक्तीला आणखी पाच किलो गहू किंवा तांदूळ. याखेरीज प्रत्येक कुटुंबास पसंतीनुसार एक किलो डाळ. हे जादा धान्य दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पूर्णपणे विनामूल्य मिळेल. हे धान्य लाभार्थी रेशन दुकानांतून दोन वेळा मिळून घेऊ शकतील.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या