पक्ष्यांच्या 'या' १० सर्वात चांगल्या फोटोंनी जिंकलं लोकांचं मन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 02:27 PM2019-08-24T14:27:33+5:302019-08-24T14:44:48+5:30

कधी-कधी काही फोटो असे असतात जे मनाला फारच भावतात. असेच काही फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. पण फोटो व्यक्तींचे नसून सुंदर पक्षांचे आहेत. ब्रिटनचे फोटोग्राफर कॅरन स्टीन यांनी 'बर्ड फोटोग्राफर ऑफ द इअर - २०१९' चा किताब जिंकला. त्यांच्या डॅलमेशन पेलिकन पक्ष्याच्या फोटोने सर्वांची मने जिंकली. फोटोत हा पक्षी ग्रीसच्या एका गोठलेल्या तलावात उडताना दिसत आहे. (All Image Credit : Daily Mail)

या कॉम्पिटिशनमध्ये जगभरातील फोटोग्राफर्सने त्यांनी काढलेले फोटो पाठवले होते. कॅरन जिंकली. पण इतरही फोटोंनी परिक्षकांची मने जिंकली. या फोटोंवर विलियम कॉलिन्स यांचं पुस्तकही येणार आहे. पण त्याआधी आम्ही तुम्हाला १० अफलातून फोटो दाखवणार आहोत. वर जो फोटो दिसत आहे तो जर्मनीचे फोटोग्राफर थॉमस हिंश यांनी काढला आहे.

हा फोटो भारतीय फोटोग्राफर यशोधन भाटिया यांनी काढला आहे. हा फोटो त्यांनी सोलापुरातील उजनी डॅमवर काढला होता.

हा फोटो कॅनडातील मार्क फेक यांनी ब्राझीलमध्ये काढला होता.

ब्रिटनचे फोटोग्राफर क्रिस गोमरसल यांनी हा फोटो काढला होता. हा फोटो त्यांनी इस्त्राइलच्या नेगेव वाळवंटात काढला होता.

ब्रेन एंड्रयू यांच्या या फोटोला बेस्ट पोट्रेट कॅटेगरीमध्ये सिल्वर अवॉर्ड मिळाला.

अमेरिकेतील निकुंज पटेलने हा फोटो न्यू जर्सीमध्ये काढला होता. त्यांना बर्ड्स इन फ्लाइट कॅटेगरीमध्ये गोल्ड अवॉर्ड मिळाला.

लंडनच्या पक्षी संग्रहालयात पांढरा पेलिकन मासा खाण्यासाठी चोच उघडतानाचा हा फोटो. हा फोटो फोटोग्राफर पेड्रो जार्क क्रेब्स यांनी काढला.

ब्रिटनचे फोटोग्राफर मार्टिन ग्रेस यांनी हा फोटो अंटार्टिकेत काढला.

बदक आणि पाण्याचं शानदार रिफ्लेक्शन या फोटोत दिसतं. हा फोटो फोटोग्राफर मार्टिन एस्क्लोज यांनी काढलाय.