नवदाम्पत्याला पहिल्या रात्री का दिला जातो दुधाचा ग्लास? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 09:00 PM2019-07-01T21:00:00+5:302019-07-01T21:00:02+5:30

अनेकदा जुन्या परंपरा या केवळ परंपरा पाळल्या जातात. मात्र त्यामागील कारणं कोणालाच माहिती नसतात. लग्नाच्या पहिल्या रात्री नवदाम्पत्याला देण्यात येणारं दूध, ही अशीच एक परंपरा. अनेकांना या परंपरेमागील कारण फार कमी लोकांना माहीत आहे.

नवदाम्पत्याला पहिल्या रात्री केशर बदामाचं दूध दिलं जातं. कारण दूध शुभ मानलं जातं. नवदाम्पत्य नव्या आयुष्याला सुरुवात करत असल्यानं ही प्रथा सुरू झाली.

नवदाम्पत्याला लग्नाच्या पहिल्या रात्री दूध देण्यामागे कामसूत्राचादेखील संदर्भ आहे. दुधामुळे शरीरातील ऊर्जा वाढते. नवदाम्पत्याचा पहिला अनुभव उत्तम असावा, हेदेखील या परंपरेमागील महत्त्वाचं कारण आहे.

नवदाम्पत्याला दिल्या जाणाऱ्या दुधात मध, साखर, हळददेखील मिसळण्यात येते. याचंही मूळ कामासूत्रात आहे.

लग्नाच्या दिवशी अनेक विधी असतात. त्यात नवदाम्पत्याचा संपूर्ण दिवस जातो. त्यामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठीदेखील त्यांना दूध दिलं जातं.

दूध आणि बदामात मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स असतात. त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग नवदाम्पत्याला शारीरिक संबंधादरम्यान होतो.

टॅग्स :दूधmilk