मुसळधार पावसाने सांगलीला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:35 PM2018-09-26T14:35:10+5:302018-09-26T14:46:31+5:30

मुसळधार पावसाने सांगलीला झोडपले. गावठाणासहीत विस्तारीत भाग तसेच गुंठेवारीत दलदल निर्माण झाली होती. अनेकठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वहात होते. सांगलीच्या शंभर फुटी रस्त्यावरील उपनगरांमध्ये पावसाने दलदल निर्माण झाली आहे. अनेकठिकाणी पावसाचे तसेच सांडपाणी साचून राहिल्याने नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. (छाया - नंदकुमार वाघमारे)

सांगलीच्या मारुती चौक, मारुती रोड, शिवाजी मंडई परिसरात बुधवारी सकाळी चिखलमय झालेले रस्ते अग्निशमन विभागाच्या वाहनांनी धुतले. याठिकाणीही पाणी साचून राहिले होते. (छाया - नंदकुमार वाघमारे)

सांगलीच्या शंभर फुटी रस्त्यावरील उपनगरांमध्ये पावसाने दलदल निर्माण झाली आहे. अनेकठिकाणी पावसाचे तसेच सांडपाणी साचून राहिल्याने नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. (छाया - नंदकुमार वाघमारे)

सांगलीच्या शासकीय रुग्णालय परिसर, स्टँड रोड, स्टेशन रोड, मारुती चौक, शिवाजी मंडई परिसर, जुना बुधगाव रस्ता, कॉलेज कॉर्नर, राजवाडा परिसर याठिकाणी बुधवारी सकाळपर्यंत पाणी साचून राहिले होते. स्टेशन रोडवर गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जुना बुधगाव रस्त्यावर इदगाह मैदानापासून काही अंतरावर गुडघाभर पाणी साचून हा रस्ता वाहतुकीसाठी जवळपास बंद झाला होता. (छाया - नंदकुमार वाघमारे)

सांगलीच्या शामरावनगरचा संपूर्ण परिसर, हनुमाननगर, लक्ष्मी-नारायण कॉलनी, त्रिमुर्ती कॉलनी, सिव्हिल रोड, पत्रकार नगर आदी भागात दलदल निर्माण झाली होती. चिखलमय झालेले रस्ते अग्निशमन विभागाच्या वाहनांनी धुतले. (छाया - नंदकुमार वाघमारे)