शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

India At Women's Cricket World Cup 2025: ‘या’ भारतीय महिला क्रिकेट खेळाडू गाजवणार वर्ल्ड कप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2025 16:17 IST

1 / 16
२०२५ चा एशिया कप उचलून मेन इन ब्ल्यूने तर भारताची मान उंचावली. आता पाळी आहे ती वूमेन इन ब्ल्यूची. भारताचा महिला क्रिकेट संघ Women's Cricket World Cup 2025 साठी सज्ज आहे.आणि जशी त्यांची टॅगलाइन आहे, जर्सी तीच, जोष तोच, टिमही तीच..टिम इंडिया!
2 / 16
कप्तान हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली आपली टिम या स्पर्धेत उतरत आहे. भारताची कॅप्टन म्हणून आणि उत्तम बॅटर म्हणून तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
3 / 16
लाखो दिलो की जान स्मृती मानधना उपकप्तान. विविध विक्रम स्वतःच्या नावावर करणारी आपली ओपनर. आता या खेळीत काय कमाल करुन दाखवते याकडे चाहत्याचे लक्ष लागलेले आहे.
4 / 16
प्रतिका रावल एक यंग टॅलेंटेड बॅटर आहे. २५ वर्षीय प्रतिका महिला टिमची तरुण खेळाडू आहे. प्रतिका एक ऑलराऊंडर खेळाडू आहे.
5 / 16
हरलीन देओल एक ऑलराउंडर खेळाडू असून, ती एक उत्तम फिल्डरही आहे. हरलीनने अशक्य वाटणारे अनेक कॅच घेतले आहेत. तिचा स्पीड आणि फिटनेस एकदमच भारी आहे.
6 / 16
दीप्ती शर्मा एक अष्टपैलू खेळाडू आहे, जी बॉलिंगमध्ये तर उत्तम आहेच, बॅटिंगमध्येही प्रभावी आहे. तिच्या बॉलिंगमुळे भारतीय संघाने अनेक सामने जिंकले आहेत.
7 / 16
सोशल मिडियावर फार लोकप्रिय असलेली मस्तीखोर भारतीय खेळाडू म्हणजे जेमिमा रोड्रिग्ज. मुंबईकर जेमिमा रोड्रिग्ज एक युवा आणि प्रतिभाशाली बॅटर आहे.
8 / 16
रेणुका सिंग ठाकूर एक फास्ट बॉलर आहे. रेणूका तिच्या पहिल्या सामन्यापासूनच तिचा उत्कृष्ट खेळ करतेय.
9 / 16
अरुंधती रेड्डी फार मस्त अशी मिडियम फास्ट बॉलर आहे. तिच्या आक्रमक खेळीसाठी ती कायमच चर्चेत असते. बॉलिंगची तिची स्टाईलही युनिक आहे.
10 / 16
ऋचा घोष एक कौशल्यपूर्ण विकेट कीपर आणि बॅटर आहे. तिच्या स्लो बॅटिंग आणि स्मार्ट विकेट कीपिंगने भारताला अनेक महत्त्वाचे महत्वपूर्ण विकेट्स मिळाल्या आहेत.
11 / 16
क्रांती गौड भारतीय टीममधील एक नवा चेहरा आहे, जी एक गोलंदाज आहे. क्रांती २२ वर्षाची आहे. हा तरुण चेहरा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये काय कमाल करतो ते पाहण्यासारखे असेल.
12 / 16
अमनज्योत कौर एक मजबूत ऑलराउंडर आहे, जी बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही उत्तम आहे. यंदाच्या संघात अनेक तरुण चेहरे आहेत त्यापैकीच एक अमनज्योतही आहे.
13 / 16
राधा यादव एक उत्कृष्ट स्पिनर आहे, जी आपल्या चेंडूने पिचवर बॅट्समनला आव्हान देते. राधा फार लोकप्रिय खेळाडू आहे. एक अक्रामक खेळाडू असूनही ग्राऊंडवर शांत राहण्याची कला राधाकडे आहे. तिने अनेक जबरदस्त विकेट्स घेतल्या आहेत.
14 / 16
श्री चराणी एक सक्षम बॅटर आणि फील्डर आहे, जी टीमच्या मिडल ऑर्डरमध्ये खेळते. तिने तिच्या फिल्डींग कौशल्याने अनेक रन आऊट्स केले आहेत. फक्त २१ वर्षाची ही खेळाडू यंदाच्या संघात महत्वाची भूमिका बजावेल अशी भारतीयांना खात्री आहे.
15 / 16
स्नेह राणा एक प्रभावी ऑलराउंडर आहे, जिने आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगचे कौशल्य वेळोवेळी दाखवले आहे. तसेच ती २०१४ पासून भारतासाठी खेळत आहे. ऑफ ब्रेक बॉलिंगसाठी ती प्रसिद्ध आहे.
16 / 16
उमा छेत्री ही या दमदार टिमची विकेट किपर आहे. स्पिडचा आणि चातुर्याचा खेळासाठी नक्कीच फायदा होईल. स्टंम्पच्या मागे उभ राहून खेळी पलटण्याची क्षमता उमामध्ये आहे.
टॅग्स :ICC Women's World Cup 2025आयसीसी महिला विश्वचषक २०२५Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीHarmanpreet Kaurहरनमप्रीत कौरSmriti Mandhanaस्मृती मानधनाICC Intercontinental Cupआयसीसी आंतरखंडीय चषक