शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिवाळ्यातच सांधेदुखीचा त्रास का वाढतो? तज्ज्ञ सांगतात ५ मुख्य कारणं आणि त्यावरचे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2024 9:11 AM

1 / 8
हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढून हाडं खूप ठणकतात. हिवाळा आल्यावरच असा त्रास का सुरु होतो, हा प्रश्न अनेकांना पडतोच. म्हणूनच आता त्यामागची ही कारणं जाणून घ्या...
2 / 8
याविषयी hindustantimes.com यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. उमा कुमार यांनी हिवाळ्यातल्या सांधेदुखीची ५ महत्त्वाची कारणं सांगितली आहेत.
3 / 8
त्यापैकी पहिलं कारण म्हणजे वजन वाढणे. हिवाळ्यात घरोघरी भरपूर तूप, सुकामेवा, पौष्टिक पदार्थ घालून लाडू केले जातात. या दिवसांत आहारातले तुपाचे प्रमाण वाढते. इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात जरा जास्त जेवण जाते. त्यामुळे हिवाळ्यात बऱ्याच जणांचे वजन वाढते. वजन वाढले की त्याचा भार गुडघ्यांवर येतो आणि गुडघेदुखी वाढते.
4 / 8
हिवाळ्यात सुर्यप्रकाश कमी असतो. त्यातही अनेकजण थंडीमुळे सकाळी घराबाहेर पडणे टाळतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढते.
5 / 8
खूप जास्त थंडीचे दिवस असतील तर आपण अंग आखडून घेतो. आपल्या शरीराची हालचाल आपोआपच कमी होते. शारिरीक हालचाली कमी झाल्याने अंग आखडते आणि मग हाडं ठणकणं सुरू होतं.
6 / 8
उन्हाळ्यात सुर्यप्रकाश कमी असल्याने अनेकांना झोप जास्त येणे, डिप्रेशन येणे, उदास किंवा निगेटिव्ह वाटणे असा त्रास होतो. याचा मानसिक परिणाम होऊनही अनेकांना आपलं दुखणं वाढल्यासारखं वाटतं.
7 / 8
हिवाळ्यात ताप, सर्दी असे व्हायरल इन्फेक्शन वाढलेले असते. व्हायरल इन्फेक्शनमुळेही अंग जास्त ठणकतं.
8 / 8
कितीही थंडी असली तरी व्यायाम करणे, सकाळी कोवळ्या सुर्यप्रकाशात फिरायला जाणे आणि आहारावर नियंत्रण ठेवून वजन वाढू न देणे हा त्यावरचा उपाय आहे, असं डॉक्टर सांगतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी