By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 10:23 IST
1 / 7केस विंचरण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे. ज्यामुळे केसांचे तुटणे आणि गळणे लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. (Which Is Right Way To Comb Hairs)2 / 7 नेहमी केसांच्या टोकांकडून विंचरायला सुरूवात करा आणि हळूहळू वर मुळांकडे जा. यामुळे केसांमधील गुंता सहज तुटतो आणि मुळांवर ताण येत नाही.3 / 7केस ओले असताना ते अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे ओले केस विंचरल्यास ते ओढले जाऊन जास्त गळतात. केस पूर्णपणे सुकल्यानंतर किंवा थोडे ओलसर असतानाच विंचरावेत.4 / 7केस विंचरण्यासाठी नेहमी रुंद दात्यांची फणी वापरा. लाकडी फणी वापरणं अधिक फायदेशीर ठरते कारण त्यामुळे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होत नाही.5 / 7जर केसांत खूप गुंता असेल तर बोटांच्या मदतीनं तो आधी सोडवून घ्या आणि मगच फणी फिरवा. जोरात फणी ओढल्यानं केसांचे कंद कमकुवत होतात.6 / 7दिवसातून फक्त २ ते ३ वेळाच केस विंचरावेत. अतिप्रमाणात फणी फिरवल्यानं केसांच्या संरचनेला इजा पोहोचते.7 / 7रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्यानं टाळूतील नैसर्गिक तेलाचा प्रसार सर्वत्र होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.