सनस्क्रीनमधील SPF चा अर्थ काय, ३० SPF की ५० SPF... त्वचेसाठी चांगलं कोणतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 16:22 IST2025-03-08T16:14:44+5:302025-03-08T16:22:57+5:30

सनस्क्रीन खरेदी करताना बहुतेक लोकांचा गोंधळ होतो की नेमकी किती SPF सनस्क्रीन खरेदी करावी. चला जाणून घेऊया त्वचेसाठी काय आहे सर्वोत्तम...

लोक उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरतात. स्किन एक्सपर्टच्या मते, सनस्क्रीनचा वापर प्रत्येक ऋतूत केला पाहिजे, मग तो हिवाळा असो वा उन्हाळा. उन्हाळ्यात बहुतेक लोक सनस्क्रीन वापरतात.

सूर्याच्या तीव्र किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जातो. सनस्क्रीन खरेदी करताना बहुतेक लोकांचा गोंधळ होतो की नेमकी किती SPF सनस्क्रीन खरेदी करावी. चला जाणून घेऊया त्वचेसाठी काय आहे सर्वोत्तम...

अनेकदा लोक SPF म्हणजे काय याबद्दल गोंधळलेले असतात. सनस्क्रीनमधील SPF नंबर त्वचेच्या किती टक्के भागाचे UV रेडिएशनपासून संरक्षण करेल हे सांगतो.

३० SPF असलेलं सनस्क्रीन त्वचेचं UV रेजपासून सुमारे ९७ टक्के संरक्षण करतं. ५० एसपीएफ त्वचेचं UV रेजपासून ९८ टक्के संरक्षण करतं.

फॉरेस्ट इसेन्शियल्स इंडियाच्या मते, त्वचेच्या प्रकारानुसार ३० SPF किंवा ५० SPF लावावं. ज्या लोकांची त्वचा अधिक संवेदनशील आहे ते ५० SPF असलेलं सनस्क्रीन लावू शकतात. तर सामान्य त्वचा असलेले लोक ३० SPF असलेले सनस्क्रीन वापरू शकतात.

३० SPF असलेले सनस्क्रीन सुमारे ९७% UV रेज फिल्टर करून त्वचेचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करतं. ३० एसपीएफमुळे सुमारे ३% UV रेज त्वचेपर्यंत पोहोचतात.

३० एसपीएफ असलेले सनस्क्रीन सूर्याच्या तीव्र किरणांपासून त्वचेचं संरक्षण करतं परंतु ते पूर्ण संरक्षण देत नाही.

५० एसपीएफ असलेले सनस्क्रीन त्वचेचं अंदाजे ९८% UV रेज पासून संरक्षण करते. ५० एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावल्याने सुमारे २% UV रेज त्वचेपर्यंत पोहोचण्यापासून रोखली जातात.

जर आपण ५० SPF ची तुलना ३० SPF शी केली तर ५० SPF हा एक चांगला पर्याय आहे. विशेषतः जे जास्त वेळ उन्हात घालवतात त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आहे.