वटपौर्णिमेला दारासमोर काढा एकापेक्षा एक आकर्षक रांगोळ्या; पाहा सोप्या डिजाईन्स फक्त एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 08:00 PM2022-06-13T20:00:43+5:302022-06-13T20:17:07+5:30

Vat Purnima 2022 Rangoli Ideas : या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनात पतीच्या दीर्घायुष्यासोबतच अपार सुख आणि मिळते

ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस वटपौर्णिमा (Vat Purnima Vrat 2022) म्हणून साजरा केला जातो. महिला आतुरतेनं या सणाची वाट पाहतात. तर बाजारपेठा फणस, आंबा, करवंद अशा वेगवेगळ्या फळांनी गजबजतात.

वटपौर्णिमेला नटणं, थटणं, गोडाधोडाचा स्वयंपाक, घराची स्वच्छता हे घरोघरच्या बायका आवडीनं करतात. या लेखात तुम्हाला वटपौर्णिमेला दारासमोर, देवापुढे काढता येतील अशा काही सोप्या रांगोळी डिजाईन्स दाखवणार आहोत. (Rangoli Design For Vat Pornima)

असं मानलं जातं की, या व्रताच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनात पतीच्या दीर्घायुष्यासोबतच अपार सुख आणि मिळते.

अनेकजणी वडाची फांदी घरी आणून पूजतात हे अत्यंत चुकीचं आहे. पर्यावरणाला हानी न पोहोचवतात आपण सण साजरे करायला हवेत. म्हणूनच घराजवळच्या वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करता. फांदी घरी आणण्याचा पर्याय निवडू नका.

कंगवा, सुपारी, बांगड्या अशा घरातल्या वस्तू वापरून सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढू शकता.

वटपौर्णिमेचा मुहूर्त आदल्या दिवशी रात्री 09:02 पासून सुरू होईल आणि 14 जूनच्या संध्याकाळी 05:21 पर्यंत राहील. यादरम्यान पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 14 जून रोजी सकाळी 11 ते 12:15 पर्यंत असेल.

(Image Credit- Social media)