गुढीपाडवा: पारंपरिक मराठी दागिन्यांची श्रीमंतीच न्यारी! दिसतात ठसठशीत, तुमच्याकडे कोणते आहेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 16:36 IST2025-03-28T12:11:53+5:302025-03-29T16:36:54+5:30

गुढीपाडवा म्हणजे मराठी वर्षाची सुरुवात. म्हणूनच या निमित्ताने गळ्यात घालण्याचे पारंपरिक मराठी दागिने कोणते, त्यांची ओळख करून घेऊया.. आणि त्यापैकी एखादा तरी दागिना अंगावर घालून गुढी उभारुया...
पहिला दागिना आहे ठुशी. ठुशी हा नाजुक दागिना अगदी छोट्याशा चिमुकलीपासून ते वयस्कर आजींपर्यंत सगळ्यांनाच शोभून दिसतो.
वज्रटीक किंवा कोल्हापुरी साज हा एक भारदस्त दागिना गळ्याला अगदी चिटकून असतो.
बकुळी हारामध्ये असणाऱ्या नाजुक रेखीव फुलांचे सौंदर्य तर खुपच लोभस वाटते..
पोहेहार किंवा श्रीमंत हाराची तर श्रीमंतीच न्यारी.. हा एकच दागिना गळ्यात पुरेसा असतो.. त्याला बाकी कशाची जोड दिली नाही तरी चालते.
मोहन माळ हा देखील एक अस्सल मराठी दागिना.. आपल्या आजी, पणजीच्या पिढीतल्या महिलांकडे हमखास मोहन माळ असायचीच..
या दागिन्याला एकदाणी म्हणून ओळखले जाते. हल्ली याची पुन्हा फॅशन आली असून ती एकपदरी, दोनपदरी, तीन पदरी अशीही आपल्या आवडीनुसार मिळते.
लक्ष्मीहार देखील बहुतांश मराठी महिलांकडे पाहायला मिळतो. हा शक्यतो एक पदरीच असतो आणि लांब असतो. पण आता गळ्याला चिटकून असणाऱ्या लक्ष्मीहारातलेही काही डिझाईन पाहायला मिळतात.
पुतळी हार हा आणखी एक प्रकार गळ्यात खूप भारदस्त वाटतो.