महागड्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही दिसतात सुंदर ॲण्टीक नेकलेस, लग्नसराईसाठी पाहा ८ सुंदर भरगच्च दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2025 15:47 IST2025-11-12T09:35:21+5:302025-11-12T15:47:22+5:30

लग्नात थोडी हेवी ज्वेलरी घातलीच जाते. मग ती नवरी असो किंवा तिच्या करवल्या आणि इतर वऱ्हाडी मंडळी असाे. आता सोन्याच्या किंमती तर सर्वसामान्यांच्या आवाक्यातल्या राहिलेल्या नाहीत.

म्हणूनच सोन्याच्या दागिन्यांचा मोह सोडा आणि हे काही सुंदर दागिने पाहा. या आर्टिफिशियल ॲण्टीक ज्वेलरी तुमचा लग्नातला लूक नक्कीच परफेक्ट करतील.

हे दागिने अगदी ५०० रुपयांपासून पुढे सुरू होतात आणि त्यांच्यामध्ये कित्येक वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.

ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही असे नेकलेस सेट मागवू शकता. खिशाला परवडणाऱ्या किमतीत अनेक सुंदर डिझाईन्स मिळू शकतात.

याशिवाय अशा पद्धतीचे दागिने तुम्ही प्रत्येक साडीवर मॅचिंग या पद्धतीनेही घेऊ शकता.

असे सुंदर दागिने पाहिले की खरंच सोन्याच्या दागिन्यांची काहीही गरज वाटत नाही.

खूप हेवी दागिने आवडत नसतील तर अशा पद्धतीचे नाजूक गळ्यातले आणि कानातल्यांचा सेटही तुम्हाला मिळू शकतो.

रफ ॲण्ड टफ प्रकारातले हे दागिने अतिशय टिकाऊ आहेत. तुम्ही व्यवस्थित ते सांभाळले तर अगदी वर्षानुवर्षे त्यांच्यावरची चमक कमी होत नाही.

















