तुमच्या घरातल्या ‘या’ ६ वस्तूंमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका! अती वापर, मृत्यूला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2025 17:20 IST2025-03-31T17:18:04+5:302025-03-31T17:20:13+5:30

Household items that cause cancer: Cancer-causing things at home: Everyday products linked to cancer: Toxic home items to avoid: Dangerous chemicals in household products: जर आपल्याही घरात या वस्तू असतील तर वेळीच आपण फेकून द्यायला हव्या जाणून घेऊयात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार बळावू शकतो.

आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. हल्ली अनेक आजारांचे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे,अशातच एक कर्करोग. (Household items that cause cancer)

अनेकदा कॅन्सर हा आजार आनुवांशिक किंवा आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे होतो. जर आपल्याही घरात या वस्तू असतील तर वेळीच आपण फेकून द्यायला हव्या जाणून घेऊयात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार बळावू शकतो. (Cancer-causing things at home)

आपल्या अनेकांच्या घरात प्लास्टिक कंटेनर, बॉटल, डब्बे किंवा प्लास्टिकच्या इतर अनेक वस्तू पाहायला मिळतील. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जेवण गरम करुन त्यात ठेवल्याने प्लास्टिकमधील घटक विघटन होण्यास मदत होते. ज्यामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

रिफाइंड ऑइलचे अधिक प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढणे, कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो. तसेच आरोग्याच्या इतर अनेक समस्या निर्माण होतात. तसेच या तेलातील रासायनिक प्रक्रियेमुळे आवश्यक पोषक तत्वे नष्ट होतात.

ॲल्युमिनियम फॉइलमध्ये अन्नपदार्थ ठेवल्याने आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे बॅक्टेरिया वाढून अन्न लवकर खराब होते. यामुळे अल्झायमर, कर्करोग आणि इतर न्यूरोलॉजिकल आजार वाढण्याची शक्यता अधिक असते.

नॉनस्टिक कुकवेअरचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. हे बनवताना वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे कर्करोग, थायरॉईड आणि यकृताचे विकार होऊ शकतात.

कॅन केलेल्या पदार्थामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे जळजळ होणे, चक्कर येणे, अपचनाचा त्रास किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो.