उन्हाळ्यासाठी खास १२ प्रकारचे बॉटम वेअर, ना घाम येईल ना रॅश - होणार नाही उन्हाचा त्रास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 20:35 IST2026-03-11T20:34:17+5:302026-03-11T20:35:02+5:30

stylish summer bottom wear for ladies : best bottom wear for women in summer : breathable women bottom wear summer : उन्हाळ्यात जाडजूड जीन्स, घट्ट लेगिंन्स नकोच! कूल राहण्यासाठी १२ बेस्ट बॉटम वेअर - घाम रॅशेजपासून सुटका असे सुटसुटीत पर्याय...

उन्हाळा सुरू झाला की कपड्यांच्या निवडीतही बदल करावा लागतो. विशेषतः महिलांना या दिवसांत जाडजूड जीन्स, स्किनी पॅन्ट्स किंवा पायाला घट्ट चिकटणारे लेगिंग्ज घालणं खूपच अस्वस्थ वाटतं. गरम हवामान, घाम आणि चिकटपणा यामुळे दिवसभर त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात हलके, सैल आणि हवा खेळती राहील असे कपडे घालणे अधिक सोयीचे ठरते(best bottom wear for women in summer).

रणरणत्या उन्हाचा पारा जसा वाढू लागतो, तसं आपल्याला हलके - फुलके कपडे घालावेसे वाटतात. पण अनेकदा आपण फॅशनच्या नादात जाडजूड जीन्स किंवा पायाला चिकटणारे घट्ट लेगिंग्ज घालतो, ज्यामुळे अंगाची लाहीलाही होते आणि घामामुळे त्वचेच्या समस्याही खूप त्रास देतात. उन्हाळ्यात केवळ कपडेच सुती असून चालत नाही, तर तुमचे 'बॉटम वेअर' (Bottom Wear) सुद्धा तितकेच हवेशीर, सुटसुटीत असणं गरजेचं असतं...

अशा परिस्थितीत, स्टायलिश लूकसोबतच आरामदायक वाटतील असे सुटसुटीत लेडीज बॉटम वेअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे कपडे फक्त कम्फर्टेबलच नसतात, तर त्यात तुम्ही ट्रेंडी आणि फॅशनेबलही दिसू शकता. उन्हाळ्यात पायांना घाम येऊ नये आणि दिवसभर आराम मिळावा यासाठी कोणते बॉटम वेअर पर्याय वापरता येतील ते पाहूयात.

प्लाझो हे उन्हाळ्यासाठी सर्वात उत्तम आणि कम्फर्टेबल मानले जातात. हे सैल आणि हवेशीर असतात. तुम्ही ते कुर्ती किंवा टॉपसोबतपेअरिंग करुन घालू शकता. शक्यतो चिकनकारी किंवा साध्या सुती प्लाझोला मोठ्या प्रमाणांत पसंती महिलांची पसंती असते. हे खूप सैल आणि हलक्या फॅब्रिकमध्ये मिळतात, त्यामुळे पायांना हवा लागते आणि घाम कमी येतो. कुर्ती, टॉप किंवा क्रॉप टॉपसोबत प्लाझो छान दिसतात.

कुलॉट्स हे गुडघ्याच्या खाली आणि घोट्याच्या वरपर्यंत असतात. हे दिसायला स्कर्टसारखे दिसतात पण पॅन्टसारखे सोयीस्कर असतात. वेस्टर्न लूकसाठी हा एक स्टायलिश पर्याय आहे.

जर तुम्हाला इंडो - वेस्टर्न लूक आवडत असेल, तर धोती पॅन्ट्स नक्की ट्राय करा. या पॅन्ट्स अतिशय सैल असतात, ज्यामुळे उन्हाळ्यातही सुटसुटीतपणा मिळून पायांना घाम येत नाही.

स्ट्रेट फिटिंगच्या सुती पॅन्ट्स किंवा फ्लेअर्ड पॅन्ट्स ऑफिसवेअर म्हणून बेस्ट पर्याय आहेत. या जीन्ससारख्या जड नसतात आणि प्रोफेशनल लूकही देतात.

लॉन्ग घागरा किंवा सुती स्कर्ट्स उन्हाळ्यात अत्यंत आरामदायक आणि कम्फर्टेबल सुंदर लूक देतात. हे कोणत्याही कॅज्युअल आऊटिंगसाठी किंवा सणासुदीसाठी अगदी 'परफेक्ट' आहेत. उन्हाळ्यात लॉन्ग स्कर्ट किंवा मिडी स्कर्ट घालणंही उत्तम पर्याय आहे.

लूज फिट ट्राउझर्स हे जीन्सचा उत्तम पर्याय ठरू शकतात. हे पायाला चिकटत नाहीत आणि हलक्या फॅब्रिकमध्ये असल्यामुळे दिवसभर आरामदायक वाटतात.

पटियाला सलवार खूप सैल असते आणि कॉटन फॅब्रिकमध्ये खूप आरामदायक वाटते. कुर्ती किंवा शॉर्ट कुर्त्यासोबत हा लूक खूप छान दिसतो आणि उन्हाळ्यात घामही कमी येतो.

अफगाणी पॅन्ट्स सैल आणि हलक्या फॅब्रिकमध्ये मिळतात. या पॅन्ट्स खूप ट्रेंडी दिसतात आणि इंडो-वेस्टर्न लूकसाठी उत्तम पर्याय आहेत.

लिनेन फॅब्रिक उन्हाळ्यासाठी खूप उत्तम मानलं जातं. लिनेन पॅन्ट्स घातल्याने घाम कमी येतो आणि दिवसभर फ्रेश वाटतं.

रॅप स्कर्ट उन्हाळ्यात खूप कम्फर्टेबल असतो. हा स्कर्ट कमरेला गुंडाळून बांधला जातो, त्यामुळे हवा खेळती राहते आणि घाम कमी येतो.

उन्हाळ्यात पाय मोकळे आणि हवेशीर ठेवण्यासाठी, हरेम पॅन्ट्स हा सर्वात उत्तम पर्याय आहे. या पॅन्ट्स मांड्यांपासून गुडघ्यापर्यंत खूप सैल असतात आणि घोट्यापाशी निमुळत्या होतात. अत्यंत हलक्या सुती किंवा रेयॉन फॅब्रिकमध्ये उपलब्ध असलेल्या या पॅन्ट्स पायाला अजिबात चिकटत नाहीत, ज्यामुळे घामाचा त्रास होत नाही.

पेपरबॅग स्टाईल पॅन्ट्स वरच्या बाजूला सैल असतात आणि कमरेला बेल्टसारखी डिझाईन असते. या पॅन्ट्स हलक्या फॅब्रिकमध्ये घेतल्या तर उन्हाळ्यासाठी स्टायलिश आणि आरामदायक पर्याय ठरतात.