1 / 7काही जणांना नेहमीच अपचन, ॲसिडीटी असे त्रास होतात. पोट फुगल्यासारखं होतं किंवा मग सतत गॅसेसचा त्रास होतो. काही जणांना नेहमीच पोट साफ होण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो..2 / 7असे कोणतेही त्रास तुम्हाला असतील तर त्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी drvaraayurveda या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.3 / 7त्यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे जेवणाची सुरुवात करण्यापुर्वी एक टीस्पून ओवा तोंडात टाका आणि अगदी बारीक चावून खा. यामुळे अन्नपचन चांगलं होण्यास मदत होते.4 / 7जेवणादरम्यान आणि जेवणानंतर बडिशेपाचं पाणी प्या. यामुळेही पचनाच्या बऱ्याच तक्रारी दूर होतील. बडिशेपाचं पाणी पिण्यासाठी १ चमचा बडिशेप १ ग्लास पाण्यात ७ ते ८ तास भिजत घालावी. 5 / 7अपचनाचा त्रास ज्यांना असतो त्यांनी नेहमी गरम अन्न खावे. थंड, शिळे अन्न खाल्ल्यास अपचनाच्या तक्रारी वाढतात. तसेच कच्चे पदार्थ म्हणजेच सॅलेड खाणेही टाळावे.6 / 7प्रत्येक घास बारीक चावून खावा. घाईघाईने अन्न चावून खाल्ल्यास अपचनाच्या तक्रारी वाढत जातात.7 / 7प्रत्येक घास बारीक चावून खावा. घाईघाईने अन्न चावून खाल्ल्यास अपचनाच्या तक्रारी वाढत जातात.