Navratri 2025 : ९ दिवस रोज काढा देवीच्या पाऊलांच्या सुंदर- रेखीव रांगोळ्या, पाहा प्रत्येक दिवसासाठी खास डिझाईन्स...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 19:21 IST2025-09-16T19:02:19+5:302025-09-16T19:21:12+5:30
special rangoli design for navratri : traditional rangoli art for navratri puja : unique rangoli patterns for navratri 2025 : दररोज वेगवेगळ्या पद्धतीने पावलांची रांगोळी काढली, तर नवरात्रीचे वातावरण आणखी मंगलमय होते.

नवरात्रीचा उत्सव म्हणजे नऊ दिवसांचा उत्साह आणि भक्तीचा सोहळाच (special rangoli design for navratri) असतो. देवीच्या आगमनासाठी घर सजवताना रांगोळीला विशेष महत्त्व असते. देवीच्या स्वागतासाठी पावलांच्या आकारात काढलेली रांगोळी अतिशय सुंदर दिसते. दररोज वेगवेगळ्या पद्धतीने पावलांची रांगोळी काढली, तर नवरात्रीचे वातावरण आणखी मंगलमय होते.
नवरात्रीच्या या दिवसांत देवीचे आगमन झाले की घरासमोर काढलेली रांगोळी (Navratri Special Nau Pavle Rangoli Design) तिच्या स्वागतासाठी सज्ज होते. नऊ दिवस, नऊ रंग आणि नऊ दिवस नऊ सुंदर, रेखीव व आकर्षक अशा देवीच्या पाऊलांच्या ९ डिझाईन्स शोभून दिसतात.
देवीच्या आगमनाचे प्रतीक म्हणून ही पाऊले काढली जातात. पण ही पाऊले दररोज एकाच प्रकारे काढण्याऐवजी, त्यांना नऊ दिवस नऊ वेगळ्या डिझाइन्समध्ये काढून सणाची शोभा अधिकच वाढवू शकता. नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी खास देवीच्या पावलांची रांगोळी कशी काढावी याच्या काही आकर्षक डिझाइन्स पाहूयात.
आपल्याकडे प्रत्येक भारतीय सणाला रांगोळीचे विशेष असे महत्व असते. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत आपण देवीच्या पाऊलांची वेगवेगळी डिझाईन्स असलेली आकर्षक अशी सुंदर, रांगोळी काढू शकता.
रांगोळी काढण्यासाठी फार मोठा घाट न घालता, आपण अगदी कमी वेळात देवीच्या पाऊलांची अशी सुंदर व तितकीच रेखीव अशी रांगोळी पटकन काढू शकतो.
पाऊलांची रांगोळी काढताना आपण सर्वातआधी पांढऱ्या रांगोळीने पाऊले काढून मग त्यात हळद, कुंकू भरुन अशा प्रकारची रेखीव व सुंदर रांगोळी काढू शकतो.
पाऊलांच्या रांगोळीभोवती आपण दिवे लावून देखील सुंदर व नाजूक अशी सजावट करु शकतो. यामुळे रांगोळी नेहमीपेक्षा अधिक जास्त खुलून दिसेल.
फक्त पांढरीच नाही तर इतर रंगांचा देखील वापर करून आपण पाऊलांची रांगोळी झटपट काढू शकतो.
रांगोळी सोबतच आपण पानांफुलांचा वापर करुन देखील देवीच्या पाऊलांची अशी रांगोळी काढू शकतो. आयत्यावेळी रांगोळी नसेल तर अशा पद्धतीने रांगोळी काढण्याचा हा उपाय उत्तम पर्याय ठरतो.
आपण फक्त देवीच्या पाऊलांची रांगोळी न काढता, पाऊलांभोवती पाने, फुले किंवा इतर डिझाईन्स काढून रांगोळी अधिक रेखीव व सुंदर करु शकतो.
सध्या बाजारांत देवीच्या पाऊलांचे रेडिमेड ठसे देखील अगदी सहज विकत मिळतात. आपण या ठशांच्या मदतीने पाऊलांची डिझाईन काढून मग त्याभोवती तुम्हाला येत असलेल्या साध्यासोप्या डिझाईन्स देखील पटकन काढू शकता.
नागवेलींची पाने, तांदूळ, सुपाऱ्या, हळद, कुंकू, ताम्हण यांच्या मदतीने देखील आपण सुबक अशी देवीच्या पाऊलांची रांगोळी काढू शकता.