Simple Rangoli: रोज घरासमोर काढण्यासाठी २ मिनिटांत होतील अशा सोप्या रांगोळ्या- १० आकर्षक डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2025 14:58 IST2025-05-23T14:53:15+5:302025-05-23T14:58:12+5:30

रोजच्या रोज दारापुढे कशी रांगोळी काढावी हा प्रश्नच पडतो. रांगोळी आणि रंग घेऊन आपण रांगोळी काढायला बसतो पण काय डिझाईन काढावं हेच सुचत नाही. त्यासाठीच बघा या काही सोप्या रांगोेळी डिझाईन्स.

या रांगोळ्या एवढ्या सोप्या आहेत की त्या तुम्ही अगदी एक ते दोन मिनिटांत काढू शकता.

सकाळच्या धावपळीत निवांत रांगोळी काढायला वेळ नसतोच. त्यामुळे हे डिझाईन तुम्ही अगदी झटपट काढू शकता.

रोज दारासमाेर अशी रांगोळी असावी जी चटकन उठून दिसावी, पण ती काढण्यासाठी जास्त वेळ लागू नये. हे त्याच प्रकारातलं डिझाईन आहे.

ही एक सुंदर रांगोळी पाहा. ही फुलं दिसायलाही खूप आकर्षक दिसतात. शिवाय तुम्ही एक फुल काढलं तरी तुमची रांगोळी छान दिसेल.

या रांगोळीमध्ये रंग भरलेले असले तरीही ही रांगाेळी अजिबात वेळखाऊ नाही. तुम्ही ती खूप लवकर, झटपट काढू शकता.

रोज दारासमाेर काढायला हे एक साधं, सोपं डिझाईन पाहा..

ही रांगोळी तुम्ही नुसती अशीही काढू शकता किंवा थोडा वेळ असेल तर वेगवेगळे रंग वापरून तिला जास्त आकर्षकही करू शकता.

सध्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यांना अशा पद्धतीची सोपी रांगोळी शिकवून ती तुम्ही त्यांच्याकडून रोज सकाळी दारापुढे काढून घेऊ शकता. मुलांचाही वेळ चांगला जाईल. काहीतरी नवं शिकायला मिळेल.

हे आणखी एक सोपं आणि खूप लवकर काढून होणारं रांगोळी डिझाईन.