चांदीच्या पैंजणांच्या १० डेलिकेट, ट्रेंडी डिजाईन्स; मिनिमलिस्टिक स्टाईल-पैंजणांना मॉडर्न लूक येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:37 IST2025-11-06T12:58:32+5:302025-11-06T13:37:33+5:30

Silver Anklets Latest Designs Trending Payal Desgns, Light Weight payal :

सध्या बाजारात जास्त नक्षीकाम नसलेले पण साधे आकर्षक मिनिमलिस्टिक स्टाईलचे नाजूक पैंजण खूपच लोकप्रिय आहेत. (Silver Anklets Latest Designs)

बारीक आणि नाजूक चांदीच्या एकाच पट्टीतले पैंजण रोजच्या वापरासाठी अधिक पसंत केले जात आहेत जे आरामदायक असतात. (Silver Payal Latest Designs)

काही पैंजणांमध्ये देव-देवतांचे किंवा पारंपारिक नक्षीकाम असलेले छोटे पेंडेंट वापरले जात आहेत. जे खास प्रसंगी शोभून दिसतात. (Stylish Silver Anklet Collection)

चांदण्या, हार्ट शेप, फुलपाखरं,छोटे मोती क्रिस्टल्स असलेले लटकन, जोडलेले पैंजण मुलींमध्ये अधिक पसंतीस उतरत आहेत.

एकाच पायात दोन किंवा तीन बारीक चेन असलेले एकमेकांना जोडून घातले जाणारे लेयर्ड पैंजण ही नवीन फॅशन आहे.

त्रिकोन, चौकोन किंवा षटकोन, पान अशा आकारांचा वापर करून पैंजणांना अधुनिक लूक दिला जातो.

पूर्वीच्या जाड पैंजणांपेक्षा आता अगदी छोटे आणि कमी घुंगरू असलेले किंवा घुंगरू नसलेले पैंजण फॅशनेबल मानले जातात.

केवळ पांढऱ्या चांदीऐवजी काही डिजाईन्समध्ये गुलाबी किंवा पिवळ्या पॉलिशचा वापर करून त्यांना वेगळा लूक दिला जातो.

दोन्ही पायांमध्ये न घालता फक्त एका पायात नाजूक पैंजण घालण्याचा ट्रेंडही सध्या दिसून येत आहे त्याजा एन्कलेट म्हणतात.

पारंपारीक आणि अधुनिक डिजाईन्सचे मिश्रण करून तयार केलेले पैंजण प्रत्येक वयोगटातील महिलांना आकर्षीत करत आहेत.