श्रावणानिमित्त बाजारात आले कमी वजनाच्या चांदीच्या जोडव्यांचे सुंदर डिझाईन्स! बघून सांगा कोणतं आवडलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 15:42 IST2025-07-15T15:34:32+5:302025-07-15T15:42:17+5:30

श्रावणी सोमवारची पूजा, मंगळागौरी, राखीपौर्णिमा, गोकुळाष्टमी अशा सणावारांच्या दिवशी (shravan special) पारंपरिक वेशभुषा करून छान तयार व्हायचं असेल तर पायात सुंदर नाजुक जोडवी हवीच..(latest patterns of toe rings)

अनेक जणी श्रावणाच्या निमित्ताने जोडव्यांची खरेदी करतात. त्यामुळेच या दिवसांत बाजारात जोडव्यांचे कित्येक नवनवीन प्रकार आलेले दिसतात. त्याचीच ही एक झलक पाहा..(silver tow ring or jodvi at low price)

सुंदर नाजुक फुल असणारं हे जोडवं तुम्ही रोज घातलं तरी चालू शकतं.

हल्ली बऱ्याच जणी रोज वापरण्यासाठी असं अगदी कमी वजनात येणारं जोडवं घेतात. हे जोडवं कोणत्याही ड्रेसिंगवर चालून जातं. त्यामुळे नेहमी काढ- घाल करण्याची गरज पडत नाही.

फुलपाखराचं हे नाजुकसं डिझाईनही अगदी पाहताक्षणीच आवडण्यासारखं आहे.

काही जणींना पारंपरिक दागिन्यांची आवड असते. त्यांना जोडव्यांचा हा पारंपरिक आणि ठसठशीत प्रकार नक्की आवडू शकतो.

नऊवारी नेसण्याचा विचार करत असाल तर त्यावर घालायला असं ठसठशीत जोडवं हवं.. हे देखणं डिझाईन खूपच वेगळं आणि आकर्षक आहे.

अशा उभट डिझाईन असणाऱ्या जोडव्यांचाही हल्ली खूप ट्रेण्ड आहे.

मोराची नक्षी असलेला कोणताही दागिना शोभूनच दिसतो. त्याच प्रकारातलं हे एक जोडवं पाहा. पायाचं सौंदर्य नक्कीच खुलून येईल.