1 / 7२०२६ चा टी 20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची चर्चा तर होतच आहे. पण त्यासोबतच आणखी एका गोष्टीचीही चर्चा आहे आणि ती म्हणजे खेळाडूंच्या पत्नीची किंवा गर्लफ्रेंडची...2 / 7सूर्यकुमार यादव याची पत्नी देवीशा शेट्टी मॅचदरम्यान नेहमीच त्याच्यासोबत दिसून आली 3 / 7क्रिकेटर संजू सॅमसन याची पत्नी चारुलता रमेश ही खूप आधीपासूनच त्याची साथ देत आहे. संजूनी चारूला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि तिथून त्यांची मैत्री जुळली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि मग लग्नात झालं.. 4 / 7सामन्यादरम्यान आणखी एक चर्चा खूप रंगली आणि ती म्हणजे हार्दिक पंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड महीका शर्मा हिची.. मालिकेदरम्यान प्रत्येक सामन्यात उपस्थित राहून ती संघाला चिअरअप करताना दिसून आली. 5 / 7जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी २०२१ मध्ये गोव्यात लग्न केलं. आज जसप्रीतच्या प्रत्येक यशात, अपयशात संजना त्याच्यामागे खंबीरपणे उभी आहे. 6 / 7क्रिकेटर ईशान किशन हा सध्या मॉडेल अदिती हुंडिया हिला डेट करतो आहे. त्या दोघांनी ऑफिशियली अजून काहीही सांगितलेलं नसलं तरी तिचा मैदानावरचा वावरच त्यांच्या नात्याची ग्वाही देणारा होता. 7 / 7कुलदिप यादव आणि वंशिका ही लोकांचं आकर्षण ठरलेली आणखी एक शांत मस्त जोडी..