शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raksha bandhan 2021 : करीना कपूरपासून तापसी पन्नूपर्यंत; 'या' बॉलीवूड अभिनेत्री आपल्या बहिणींनाच बांधतात राखी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 11:26 AM

1 / 7
रक्षाबंधनाचा सण बहिण भावाच्या नात्यासाठी खूप खास असतो. प्रत्येक बहिण भाऊ या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात. बॉलीवूडमध्ये काही तारका अशा आहेत ज्यांना भाऊ स्वतःचा सख्खा भाऊ नाही. त्यामुळे दरवर्षी या अभिनेत्री आपल्या जीवाभावाच्या बहिणींनाच राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. अभिनेत्री तापसी पन्नू तिची बहीण शगुन पन्नूच्या खूप जवळ आहे. त्या दोघी एकमेकांसोबत सावलीसारख्या राहतात. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू देखील रक्षाबंधनाचा सण तिची बहीण शगुन पन्नूसोबत साजरा करते आणि दरवर्षी या दोघी बहिणी एकमेकांना राखी बांधतात.
2 / 7
अभिनेत्री कृती सेनॉन आणि नुपूर सेनॉन या दोघी बहिणीसुद्धा रक्षाबंधनाचा सण हटके पद्धतीनं साजरा करतात. सुरूवातीपासूनच एकमेकांच्या मनगटावर राखी बांधून त्या राखीचा सण साजरा करत आल्या आहेत.
3 / 7
अभिनेत्री भूमी पेडणेकरची बहिण समिक्षा पेडणेकर आहे. या दोन बहिणी एकमेकांच्या खूप जवळ आहेत. भूमी आणि समिक्षा एकमेकांच्या बहिणी तसेच भाऊसुद्धा आहेत. म्हणूनच त्या रक्षाबंधनाच्या दिवशी एकमेकांच्या हातावर राखी बांधून सण साजरा करतात.
4 / 7
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अनिशा पदुकोण देखील दरवर्षी एकमेकांसोबत राखीचा सण साजरा करतात. दरम्यान या दोघी कधीही आपलं सेलिब्रेश सोशल मीडयावर शेअर करत नाहीत.
5 / 7
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांनाही भाऊ नाहीत. या दोघी एकमेकांचे भाऊ आणि बहीण आहेत. या दोन्ही दरवर्षी बहिणी आपला चुलत भाऊ रणबीर कपूरला राखी बांधून दरवर्षी हा सण साजरा करतात.
6 / 7
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा या दोघी बहिणी आहेत. दरवर्षी दोघेही एकमेकांसोबत राखीचा सण साजरा करत आले आहेत. विशेष म्हणजे मलायका अरोराची बहीण अमृता दरवर्षी तिचे एक्स जिजू अरबाज खानला राखी बांधते.
7 / 7
अभिनेत्री काजल अग्रवालला एक बहीण आहे ती म्हणजे निशा अग्रवाल आहे. जिच्यासोबत काजल दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा करते.
टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनIndian Festivalsभारतीय सणDeepika Padukoneदीपिका पादुकोणkriti Sonnenक्रिती सनॉनKajal Aggarwalकाजल अग्रवालbhumi pednekarभूमी पेडणेकर Taapsee Pannuतापसी पन्नूMalaika Arora Khanमलायका अरोराKareena Kapoorकरिना कपूर