शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ सांगतात, वयाच्या पंचविशीनंतरही दूध पिणं आवश्यक! फक्त 'या' पद्धतीने प्या, होतील जास्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2024 18:04 IST

1 / 6
वयाच्या पंचविशीनंतर कोणत्या पद्धतीने दूध प्यायलं तर ते अधिक पाचक ठरतं याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती एकदा बघायलाच पाहिजे...
2 / 6
बहुतांश लोक रात्री झोपण्यापुर्वी किंवा सकाळी नाश्त्यामध्ये कपभर, ग्लासभर दूध हमखास घेतात. दुधामधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि इतर पदार्थ मिळतात. त्यामुळे आपण आवर्जून दूध घेताेच.
3 / 6
पण दूध प्यायल्याने अनेकांना पचनाचे त्रास होतात. दूध प्यायल्यामुळे गॅसेस, पोट फुगल्यासारखं होणं, पोट जड होणं असा त्रास होतो. अशा लोकांनी एका खास पद्धतीने दूध प्यायला पाहिजे, असं आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.
4 / 6
podcast.pub या इन्स्टाग्राम पेजवर याविषयीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तज्ज्ञ असं सांगत आहेत वयाच्या पंचविशीनंतर डायल्यूट केलेलं दूध प्यायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या ग्लासात अर्धे दूध आणि अर्धे पाणी हवे. ते दूध गायीचं असलं तरी अशाच पद्धतीने ते प्यावं.
5 / 6
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्याा मुलाखतीत डेअर प्रोडक्ट्स एक्सपर्ट राविन सलुजाही सांगतात की पंचविशीनंतर दूध पिण्याची पद्धत थोडी बदलायला हवी. कारण त्या वयानंतर घट्ट दुधापेक्षा पातळ दूधच पचायला सोपं जातं. त्यातले कॅल्शियम आणि इतर पौष्टिक घटक शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होते.
6 / 6
पंचवीसपेक्षा जास्त वय असणाऱ्या सगळ्यांनीच या पद्धतीने दूध प्यावं असं नाही. ज्यांना दूध व्यवस्थित पचतं त्यांनी नेहमीप्रमाणे घ्यावं. ज्यांना पचत नाही त्यांनी या पद्धतीने उपाय करावा. पण वाढत्या वयानुसार असं पाणीमिश्रीत दूध प्यायलेलंच अधिक चांगलं असं तज्ज्ञ सांगतात.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmilkदूध