लग्नसराई स्पेशल : आर्टिफिशियल पोल्की ज्वेलरी घ्या, पाहा नजर खिळवून ठेवणारे स्टायलिश- सुंदर दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2024 14:44 IST2024-03-28T13:31:33+5:302024-03-28T14:44:15+5:30

दागदागिन्यांचा ट्रेण्ड नेहमीच बदलत असतो. तसाच सध्या पोल्की ज्वेलरीचा खूप ट्रेण्ड आहे. त्यामुळेच यंदाच्या लग्नसराईमध्ये पोल्की दागिन्यांना खूप मागणी आहे.

पोल्की दागिने हे हिऱ्यांवर काम करून तयार करण्यात आलेले हॅण्डक्राफ्ट दागिने असतात. या दागिन्यांची खासियत अशी असते की त्यामध्ये हिरे त्यांच्या नैसर्गिक स्वरुपात वापरण्यात आलेले असतात.

सणासुदीच्या काळात किंवा लग्न- समारंभात सेलिब्रिटीही अनेकदा पोल्की दागिन्यांमध्येच दिसतात.

खरे पोल्की दागिने घेणं अतिशय महागडं असलं तरी आर्टिफिशियल प्रकारातले पोल्की दागिने खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत. ५०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत हे दागिने मिळू शकतात.

अशा पद्धतीचं एखादं नाजूक गळ्यातलं तुम्ही ड्रेस, साडी, लेहेंगा असं कशावरही घालू शकतात.

पारंपरिक वेशभुषा करायची असेल तर हे दागिने छान दिसतातच. पण अशा पद्धतीच्या वेस्टर्न कपड्यांवरही पोल्की दागिने अतिशय ट्रेण्डी वाटतात.

असं एखादं चोकर असेल तर तुमचा लूक अतिशय क्लासी आणि रिच वाटताे.. आकर्षक ठरतो.