स्टायलिश-हॉट बॅकलेस ब्लाऊज घालून ब्रेसियर दिसते, लूक खराब? ७ ब्रेसियर प्रकार घ्या-स्टाइल आणि कम्फर्ट दोन्ही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2026 16:44 IST2026-02-04T16:21:28+5:302026-02-04T16:44:12+5:30

perfect bra for backless blouse : how to choose bra for backless blouse : backless blouse bra options : bra for deep neck blouse : बॅकलेस ब्लाऊजमधून ब्रेसियर दिसण्याचं टेंन्शन विसरा, पाहा बॅकलेस ब्लाऊजमध्ये ब्रेसियर लपवायच्या ट्रिक्स...

आजकाल फॅशनमध्ये स्टायलिश, डीप नेक, बॅकलेस किंवा कटआऊट ( how to choose bra for backless blouse) ब्लाऊजचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. अशा ब्लाऊजमुळे साडी किंवा लहेंग्याचा लूक अधिक ग्लॅमरस दिसतो, मात्र अनेकजणींची एकच तक्रार असते ती म्हणजे, ब्रेसियरच्या स्ट्रिप्स किंवा हुक्स पटकन दिसून येतात.

स्टायलिश आणि बॅकलेस ब्लाऊज घालण्याची हौस तर प्रत्येकीला (backless blouse bra options) असते, पण बऱ्याचदा ब्रेसियरच्या स्ट्रॅप्स (Bra Straps) बाहेर दिसतील या भीतीने अनेकजणी असे स्टायलिश किंवा ट्रेंडी ब्लाऊज घालणं टाळतात. ट्रान्सपरंट स्ट्रॅप्स लावूनही त्या चमकतात आणि आपला लुक बिघडवू शकतात.

कितीही सुंदर ब्लाऊज असला तरी मागे किंवा बाजूला दिसणाऱ्या ब्रेसियर स्ट्रिप्समुळे संपूर्ण लूक बिघडतो. मात्र योग्य प्रकारचा ब्रेसियर निवडला किंवा काही स्मार्ट उपाय केले, तर ही समस्या सहज टाळता येऊ शकते. म्हणूनच स्टायलिश किंवा बॅकलेस ब्लाऊजमध्ये नेमके कोणते ब्रेसियर घालावेत आणि कोणते पर्याय वापरावेत, हे जाणून घेणे हे प्रत्येकीसाठी महत्त्वाचे असते.

बॅकलेस किंवा डीप नेक स्टायलिश ब्लाऊज घालताना योग्य अंतर्वस्त्र (Bra) निवडणे खूप महत्त्वाचे असते, जेणेकरून तुम्हाला हवा तसा लुक मिळेल आणि तुम्ही कम्फर्टेबल राहाल.

जर तुमच्या ब्लाऊजला पाठीमागे दोरी असेल किंवा तो 'हॉल्टर नेक' स्टाईलचा असेल, तर तुमच्यासाठी सीमलेस कन्व्हर्टिबल ब्रा (Seamless Convertible Bra) किंवा बॅकलेस अंडरवायर स्ट्रॅपलेस ब्रा हा सर्वात उत्तम पर्याय ठरेल. या प्रकारच्या ब्रेसियर ब्लाऊजच्या खाली पूर्णपणे लपल्या जातात आणि तुमच्या शरीराला योग्य आकार व सपोर्ट देतात.

आजकाल पतळ्या स्ट्रॅप असलेले बॅकलेस ब्लाऊज खूप ट्रेंडमध्ये आहेत. अशा ब्लाऊजसोबत सिलिकॉन अ‍ॅडहेसिव्ह ब्रेसियर (Silicone Adhesive Bra) परफेक्ट पर्याय ठरतो. ही ब्रेसियर थेट त्वचेवर चिकटते आणि यामध्ये कोणतीही स्ट्रॅप नसते, त्यामुळे ती पूर्णपणे इनव्हिजिबल राहते. जर तुम्हाला थोडा अधिक सपोर्ट हवा असेल, तर ट्रान्सपरंट स्ट्रॅप असलेला ब्रेसियर हाही चांगला पर्याय ठरू शकतो.

जर तुमचा ब्लाऊज ट्यूब-टॉप स्टाइलचा असेल किंवा त्यामध्ये मागच्या बाजूला खूपच कमी कपडा असेल, तर स्टिक-ऑन कप ब्रेसियर (Stick-on Cup Bra) हा सर्वात उत्तम पर्याय ठरतो. हा ब्रेसियर डीप नेक आणि स्ट्रिंग असलेल्या ब्लाऊजसोबतही अतिशय चांगल्या प्रकारे वापरता येतो आणि बाहेरून अजिबात दिसत नाही.

जर तुमच्या ब्लाऊजची नेकलाईन खूप खोल (Plunging) असेल, तर पेस्टीज किंवा निप्पल कव्हर्स (Pasties / Nipple Covers) हा एक उत्कृष्ट उपाय आहे. हे अ‍ॅडहेसिव्ह कव्हर्स असतात, जे आवश्यक संरक्षण देतात आणि ब्रेसियरच्या लाईन्स दिसण्याची झंझट पूर्णपणे दूर करतात.

जर तुमच्याकडे आवडती रेग्युलर ब्रा असेल, तर तुम्ही 'कन्व्हर्टर स्ट्रॅप्स' वापरू शकता. हे स्ट्रॅप्स तुमच्या ब्राच्या बँडला खाली ओढून कमरेच्या भागात फिक्स करतात, ज्यामुळे डीप बॅक ब्लाऊजमध्ये ब्रा दिसत नाही.

ज्यांना स्ट्रॅपलेस किंवा स्टिक-ऑन ब्रा मध्ये कंफर्टेबल वाटत नाही, त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे. यात पाठीमागची पट्टी पारदर्शक प्लास्टिकची असते, जी लांबून दिसून येत नाही.

आजकाल अनेक डिझायनर ब्लाऊजमध्ये आधीच पॅडेड कप्स दिलेले असतात. यामुळे वेगळा ब्रेसियर घालण्याची गरजच राहत नाही. हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर उपाय आहे. ब्लाऊज शिवतानाच त्यात दर्जेदार 'पॅड्स' बसवून घ्या. यामुळे वेगळी ब्रेसियर घालण्याची गरज उरत नाही आणि बॅक पूर्णपणे क्लीन दिसते.