करवलीचा शाही थाटमाट! पैठणी साडीचे रॉयल लेहेंगा डिझाईन्स - लग्नात करवलीचा लूक होईल सुपरहिट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2025 19:00 IST2025-11-21T19:00:00+5:302025-11-21T19:00:02+5:30
paithani saree lehenga design : paithani lehenga designs : paithani lehenga patterns : करवलीसाठी पाहा पैठणी साडीचे लेहेंगा पॅटर्न, लग्नात नवरी इतकीच करवलीही दिसेल खास...

लग्न म्हटलं की, नवरीपेक्षाही जास्त चर्चा असते ती नवरीच्या बहिणीची किंवा तिच्या खास (paithani saree lehenga design) करवलीची! नवरीसोबत प्रत्येक क्षणी उपस्थित राहणाऱ्या करवलीचा लूक हा तितकाच खास आणि हटके असायला हवा, जो ट्रेडिशनल सोबतच फॅशनेबल देखील असायला हवा.

साखरपुडा, ग्रहमक किंवा खास समारंभात नवरीसोबत असणाऱ्या (paithani lehenga patterns) करवलीला पारंपरिक, रॉयल आणि स्टनिंग लूक हवा असतो. अशावेळी पैठणी साडीचा लेहेंगा ही आजकालची सर्वात ट्रेंडिंग आणि क्लासिक फॅशन आहे.

पैठणी साडीचा लेहेंगा पॅटर्नमुळे आपल्याला पारंपरिक साडी नेसण्याच्या झंझटीपासून सुटका होते आणि लग्नात मनसोक्त नाचण्याची आणि फोटोंमध्ये उठून दिसता येते.

पैठणीचा मखमली पोत, तिचे चमकदार रंग आणि पारंपरिक मोर किंवा बुट्टीची नक्षी, झरी काम जेव्हा लेहेंग्यावर दिसते, तेव्हा तो लूक खरंच सुंदर व देखणा दिसतो.

पैठणीची सोनसळी झरी, मोर - कमळाच्या नक्षीची रेखीव उठावदार बॉर्डर आणि चमकदार रंगसंगती जेव्हा लेहेंग्यावर खुलते, तेव्हा त्या लूकवरुन नजर हटविणे अशक्य होते.

पैठणी साडीपासून तयार केलेल्या लेहेंग्यावर हटके स्टाइल दुपट्टा, नथ, चंद्रकोर टिकली आणि टेम्पल ज्वेलरी घातली की परफेक्ट करवली लूक तयार होतो.

करवलीच्या लूकला शाही आणि पारंपरिक टच देण्यासाठी पैठणी लेहेंगा हा सर्वोत्तम पर्याय आहे.

पारंपरिक पैठणी साडीपासून तयार केलेले लेहेंगे संगीत, हळदी किंवा रिसेप्शन अशा लग्नाच्या कोणत्याही कार्यक्रमात उठून दिसतात.

पैठणी साडीची सुंदर, देखणी बॉर्डर आणि झरीचा वापर करून आपण लेहेंगा किंवा लेहेंग्याच्या दुप्पट्याला एकदम खास आणि रॉयल लूक देऊ शकतो.

नवरीच्या साडीचा रंग किंवा तिच्या साडीच्या रंगाला मिळताजुळता किंवा शोभून दिसेल अशा रंगाची निवड करून तुम्ही नवरीसोबत पेअरिंग देखील करु शकता.

















