१ ग्रॅम मंगळसूत्राच्या १० सुंदर-डेलिकेट डिजाईन्स; रोज वापरा-साधेपणात स्टायलिश लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:18 IST2025-11-02T12:08:29+5:302025-11-03T13:18:54+5:30

One Gram Gold Mangalsutra Daily wear light Weight Mangalsutra : मंगळसूत्राला अधिक आकर्षक बनवण्यासाठी बारीक रंगीत खड्यांचा किंवा मोत्यांचा वापर पेंडंटमध्ये केला जातो.

रोजच्या वापरासाठी (Short Mangalsutra) सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे 1 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र हा लोकप्रिय आणि परवडणारा पर्याय बनला आहे. (One Gram Gold Mangalsutra Designs)

हे मंगळसूत्र अतिशय लाईटवेट असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या किंवा घरी काम करणाऱ्या महिलांसाठी दिवसभर घालण्यासाठी उत्तम आहेत. (Light Weight Gold Mangalsutra Short)

सध्याच्या अधुनिक ट्रेंडमध्ये अगदी लहान, नाजूक आणि बारीक डिझाईन्सचे पेंडंट असलेले मंगळसूत्र जास्त पसंत केले जात आहेत.

जास्त नक्षीकाम किंवा मोठे मणी नसलेले साधे, मिनिमलिस्ट आणि आकर्षक डिजाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. जे वेस्टर्न आणि इंडियन वेअर अशा दोन्हींवर शोभून दिसतात.

मानेच्या जवळ येणारी छोटी लेंथ असलेल्या मंगळसूत्रांना मोठी मागणी आहे. जी अधुनिक कपड्यांवर व्यवस्थित मॅच होते.

पारंपारीक वाट्यांसोबतच इन्फिनिटी, सोलायटअर, हिऱ्यासारखे पेंडंट, इव्हिल आय असलेले मॉडर्न डिजाईन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

काही डिझाईन्समध्ये काळ्या मण्यांच्या एकापेक्षा जास्त नाजूक तारांचा समावेश असतो. ज्यामुळे एक स्टायलिश लूक मिळतो.

मंगळसूत्राला अधिक आकर्षक बनवण्यासाठी बारीक रंगीत खड्यांचा किंवा मोत्यांचा वापर पेंडंटमध्ये केला जातो.

1 ग्रॅम गोल्ड फॉर्मिंग किंवा गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र हे योग्य काळजी घेतल्यास रोजच्या वापरासाठी पुरेसे टिकाऊ असतात.

हे मंगळसूत्र नाजूक असल्यामुळे वापरताना काळजी घ्या. केसांमध्ये किंवा ड्रेसमध्ये अडकून तुटू नये यासाठी विशेष काळजी घ्या.