नवरात्री गरबा- दांडिया स्पेशल ऑक्सिडाईज मंगळसूत्र- ८ लेटेस्ट डिझाईन्स, दांडिया लूक होईल परफेक्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2025 12:58 IST2025-09-16T17:03:18+5:302025-09-22T12:58:01+5:30

नवरात्रीमध्ये गरबा, दांडिया खेळायला जाताना गळ्यात कोणतं मंगळसूत्र घालावं असा प्रश्न पडला असेल तर हे काही ऑक्सिडाईज मंगळसूत्रांचे डिझाईन्स पाहा..(Navratri 2025- garba dandiya special oxidised mangalsutra designs)

असे कित्येक गरबा- दांडिया स्पेशल सेट बाजारात मिळत आहेत.

यापैकी कोणताही सेट निवडला तरी तुमचा गरबा- दांडिया लूक स्पेशलच होणार..

ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही अशा पद्धतीचे ऑक्सिडाईज मंगळसूत्र मागवू शकता.

अशा हेवी प्रकारातले मंगळसूत्र गरबा- दांडियाच्या लूकला शोभून दिसतात.

हे मंगळसूत्र गळ्याशी घालून खाली एखादा मोठा ऑक्सिडाईज दागिना घातला तरी खूप उठून दिसेल.

अशा पद्धतीचं मंगळसूत्र चोकर किंवा ठुशी मंगळसूत्रही दांडिया लूकसोबत अगदी परफेक्ट मॅच होतं.

असं ठसठशीत मंगळसूत्र आणि त्यावर मोठे कानातले असं जर तुम्ही घातलं तर गळ्यात इतर कोणता दुसरा दागिना घालण्याची गरजच नाही.

















