1 / 9नवरात्रीच्या उपवासामुळे ॲसिडीटी वाढण्याचा त्रास अनेकांना होतो. एनर्जी एकदम कमी झाल्यासारखी वाटते. त्यामुळे खूप गळून गेल्यासारखे होते. म्हणूनच नवरात्रीच्या सलग उपवासांचा त्रास होऊ नये म्हणून खाताना या काही गोष्टींची काळजी घ्या..2 / 9उपवास करताना कोणते पदार्थ आवर्जून खावेत, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dietitian.dnyanada या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की दिवसाची सुरुवात मुठभर सुकामेवा खाऊन करा. यामुळे दिवसभर पुरेल एवढी एनर्जी मिळेल.3 / 9त्यानंतर चहा- कॉफी असं काही घेणं टाळा. त्यामुळे ॲसिडीटी वाढते. त्याऐवजी कपभर दुधात एक चमचा गुलकंद टाकून प्या.4 / 9नाश्त्यामध्ये राजगिरा किंवा भगरीचे डोसे, भाजणीचे थालिपीठ खा. तसेच नाश्ता झाल्यानंतर थोडेसे लिंबू पाणी प्या. यामुळे व्हिटॅमिन सी पोटात जाऊन एनर्जी मिळेल.5 / 9नाश्ता झाल्यानंतर साधारण २ तासांनी एखादे फळ खा.6 / 9दुपारच्या जेवणात भगर, राजगिरा, भाजणीचे थालीपीठ यासोबत नवरात्रीच्या उपवासाला चालणाऱ्या भाज्या जास्त प्रमाणात खा.7 / 9सायंकाळी चहा घेण्याची खूपच तल्लफ आली तर अगदी अर्धा कप चहा किंवा कॉफी घ्या.सायंकाळी भूक लागल्यास एखादा उकडलेला बटाटा किंवा उकडलेलं रताळं किंवा मग एखादं फळ खा.8 / 9रात्रीच्या जेवणात पुन्हा उपवासाचा डोसा किंवा पराठा, भगर असं काही खाण्यावर भर द्या. 9 / 9त्यानंतर रात्री झोपताना पुन्हा कपभर दुधात गुलकंद टाकून प्यायल्यास ॲसिडीटीचा त्रास होणार नाही.