शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर भिजवलेल्या हिरव्या मुगाचे करा ६ चविष्ट पदार्थ, मुलेही आवडीने खातील घरचा पौष्टिक खाऊ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2026 15:11 IST

1 / 7
हिरवे मूग आरोग्यासाठी फार चांगले असतात. चविष्टही असतात आणि पौष्टिकही. आठवड्यातून दोनदा तरी मुग खावे. त्यातून मिळणारे पोषण भूक नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करते. पाहा हिरव्या मुगाचे चविष्ट पदार्थ.
2 / 7
हिरव्या मुगाचे पीठ तयार करुन त्याचे लाडू करता येतात. अगदी सोपी रेसिपी आहे. तसेच त्यात गूळ घालून केले तर चवी अजून छान लागते. त्यामुळे एकदा नक्की करुन पाहा.
3 / 7
हिरवे मूग रात्रभर भिजवायचे त्यासोबत तांदूळ रवा डाळीही भिजवायच्या. सकाळी वाटून घ्यायच्या आणि त्याचे डोसे लावायचे. चवीला खुप मस्त लागतात. पाहा कसे करायचे.
4 / 7
हिरव्या मुगाची भेळही करता येते. फारच सोपी आहे आणि चविष्ट होते. मूग शिजवून घ्यायचे. त्यात मस्त कांदा, टोमॅटो घालायचा. काकडी घालायची. इतरही सगळे पदार्थ घालायचे. मसाले घालायचे.
5 / 7
मुगाची उसळ कुकरमध्ये केली की झटपट होते आणि घट्ट चविष्टही होते. त्यात मसाले घालायचे आणि आवडीनुसार भाज्याही घालायच्या.
6 / 7
मुगाची उसळ कुकरमध्ये केली की झटपट होते आणि घट्ट चविष्टही होते. त्यात मसाले घालायचे आणि आवडीनुसार भाज्याही घालायच्या.
7 / 7
मुगाची उसळ तयार करुन त्यात दही घालून मस्त चाट तयार करता येते. सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. संध्याकाळी काही चटपटीत खायची इच्छा होत असेल तर हा पदार्थ करुन खा. मस्त लागतो.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्स